Rape Case: जावयाचा सासूवर बलात्कार, अश्लील फोटो काढले अन् म्हणाला…

मुंबई तक

ADVERTISEMENT

son in law raped mother in law by feeding her alcoholic substance now showing obscene pictures the pressure of staying together
son in law raped mother in law by feeding her alcoholic substance now showing obscene pictures the pressure of staying together
social share
google news

Crime: लखनऊ: नात्याला तडा देणारी एक अत्यंत लाजिरवाणी घटना उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात घडल्याचं समोर आलं आहे. नात्याने जावई (Son-in-law) असणाऱ्या एका व्यक्तीने आधी आपल्या सासूवर (Mother-in-law) बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली आहे. पीडित सासूने केलेल्या आरोपानुसार, बलात्कारानंतर जावयाने तिचे काही आक्षेपार्ह फोटोही काढले. याच फोटोंची धमकी देत जावई हा सासूवर एकत्र राहण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आता आरोप करण्यात आला आहे. सासूने असाही आरोप केला आहे की, नकार दिल्यानंतरही जावयाने तिचे अश्लील फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. (son in law raped mother in law by feeding her alcoholic substance now showing obscene pictures the pressure of staying together)

ADVERTISEMENT

नेमकी घटना काय?

या प्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, त्याबाबत कोणतीही कारवाई झालली नाही. अशा स्थितीत व्यथित होऊन पीडित महिलेने थेट न्यायालयात धाव घेतली, जिथे न्यायालयाच्या आदेशावरून कालिंजर पोलीस ठाण्यात बलात्कारासह अन्य गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टेशन प्रभारी हेमराज सरोज यांनी सांगितले की, या प्रकरणी एफआयआर नोंदवल्यानंतर पुरावे गोळा करण्याची कारवाई सुरू आहे.

हे ही वाचा >> भाजीच्या गोणीवर बसला अन् 15 वर्षीय मुलाला मृत्यूनं गाठलं, नेमकं काय घडलं?

हे प्रकरण कालिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावाशी संबंधित आहे, जिथे पीडित महिलेने तक्रार अर्ज देताना सांगितले की, तिच्या नात्यातील एक जावई हा त्यांच्या घरी यायचा आहे. वर्षभरापूर्वी त्याने सासूला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर पाशवी बलात्कार केल्याची घटना घडली. त्यासोबतच त्याने सासूचे काही अश्लील फोटोही आपल्या मोबाइलमध्ये काढले होते. ज्यानंतर हेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी सातत्याने महिलेवर अत्याचार करत होता. एवढंच नव्हे तर तो तिला सोबत राहण्यासाठीही दबाव टाकत होता.

हे वाचलं का?

या प्रकरणाला दुजोरा देताना कालिंजर पोलीस स्टेशनचे स्टेशन प्रभारी हेमराज सरोज यांनी सांगितले की, कोर्टाच्या आदेशानंतर सुनेविरुद्ध बलात्कारासह गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांनी सांगितले की, महिलेचा आरोप आहे की तिच्या नात्यातील जावयाने तिच्यावर बलात्कार केला. आक्षेपार्ह फोटोही काढले. याबाबत आता पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> लग्न केलं पण शारीरिक संबंधच ठेवले नाही, वैतागलेल्या बायकोने…

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाने पीडित महिला आणि आरोपी जावयाच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे. कारण नात्याने जावई असणाऱ्या या आरोपीची आपल्या सासूवरच वाईट नजर असल्याने आता या प्रकरणाची संपूर्ण गावातही चर्चा सुरू आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT