महाराष्ट्र हादरला.. 17 वर्षीय मुलाचा अडीच वर्षाच्या चिमुकलीवर पाशवी बलात्कार, नंतर..

मुंबई तक

ADVERTISEMENT

17 year old boy brutally rapes 2 and a half year old girl tries to kill her shocking incident in buldhana
17 year old boy brutally rapes 2 and a half year old girl tries to kill her shocking incident in buldhana
social share
google news

Buldhana Rape Case: जका खान, बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद अशी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका अडीच वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे. पीडित बालिकेची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून तिला पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले आहे. (17 year old boy brutally rapes 2 and a half year old girl tries to kill her shocking incident in buldhana)

ADVERTISEMENT

नेमकं प्रकरण काय?

याबाबत प्राप्त माहिती अशी की, बोराखेडी पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात अडीच वर्षीय बालिकेला 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास चॉकलेटचं आमिष दाखवून त्याच गावातील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाने एका पडक्या घरात चिमुकलीला नेलं व तिच्यावर अमानुष बलात्कार केला. तसेच तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या कृत्याने बालिका बेशुद्ध झाली असता तिला मृत समजून आरोपी तिथून निघून गेला.

हे ही वाचा >> Crime : लग्नाच्या पहिल्याच रात्री घात, खिरीमध्ये गुंगीचे औषध मिसळून…लग्नघरात काय घडलं?

पीडित मुलगी दिसत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. अनेक तास शोध घेतल्यानंतर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पडक्या घराजवळून एक व्यक्ती जात असताना त्याला मुलीच्या रडण्याचा आवाज आला. म्हणून त्याने कडी उघडून आत पाहिले. त्यावेळी त्याला पीडित बालिका दिसून आली. यावेळी तिच्या तिच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता. त्या व्यक्तीने तात्काळ चिमुकलीला बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, बालिकेची परिस्थिति नाजूक असल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी अकोला सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बोरखेडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार बळीराम गीते हे आपल्या पथकासह गावात दाखल झाले व आरोपीबद्दलची माहिती काढून त्यांनी तात्काळ हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या अल्पवयीन वासनांध आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

हे ही वाचा >> Deep fake : रश्मिका मंदानानंतर रतन टाटांचा डिपफेक व्हिडिओ व्हायरल, व्हिडीओत काय?

याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली असून आता पुढील कारवाई करण्यात येत आहे. बुलढाणा SP सुनील कडासने यांनी बलिकेची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT