Thane : विधवा महिलेशी जवळीक वाढवली, लग्नाचं आमिष दाखवून वर्षभर... 22 वर्षीय तरूणावर गुन्हा दाखल
Thane News: लग्नाच्या नावाखाली बलात्कार झाल्याच्या घटना अनेकदा समोर येतात. अशीच घटना ठाण्यात घडली. एका नराधमाने लग्नाच्या बहाण्यानं महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची माहिती समोर आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

विधवा महिलेला विश्वासात घेऊन दिलं लग्नाचं आश्वासन

वर्षभर महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप

ठाणे पोलिसांकडे आलेल्या तक्रारीत नेमकं काय प्रकरण?
Thane Crime : ठाण्यात एका 22 वर्षीय तरुणाने 29 वर्षीय महिलेवर अनेक वेळा बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. कापूरबावडी पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, महिलेनं दावा केला की, आरोपीने फेब्रुवारी 2023 ते डिसेंबर 2024 दरम्यान आपल्यावर बलात्कार केला. पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
हे ही वाचा >>'CM फडणवीसांनी मुंडेंना स्वत: जाऊन सांगितलं आता राजीनामा द्या', सुरेश धसांनीच सांगितली Inside स्टोरी
लग्नाच्या नावाखाली बलात्कार झाल्याच्या घटना अनेकदा समोर येतात. असाच एक प्रकार 10 दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील कल्याणमधून समोर आला होता. एका नराधमाने लग्नाच्या बहाण्यानं महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची माहिती समोर आली. महिलेनं लग्नाबाबत विचारणा केली असता, आरोपीने महिलेला धमकावलं आणि मारहाणही केली. याप्रकरणी महिलेनं पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
हे ही वाचा >> लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी खोलीत गेले, सकाळी कुटुंबानं दार तोडल्यावर दोघांचे मृतदेह सापडले... थरारक घटनेनं सगळे हादरलं
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कोळसेवाडी भागातील आहे. पोलिसांनी सांगितलं की, राम नारायण गुप्ता असं आरोपीचं नाव असून, तो जीन्स आणि पॅन्ट पॅकिंगच्या व्यवसायात पीडितेसोबत भागीदार होता. पीडितेच्या पतीच्या मृत्यूनंतर आरोपीची महिलेशी जवळीक वाढली. त्याने आधी गोड बोलून महिलेला आमिष दाखवून तिचा विश्वासात घेतलं नंतर लग्नाच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार केला. हे सगळं सुमारे सहा वर्षे चालू होतं.