हार्ट अटॅक नाही तर व्हायग्रा... अल्पवयीन मुलीवर अत्याचार करताना 41 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू!
Crime News : मुंबईत ग्रँट रोड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका हॉटेलमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करताना एका 41 वर्षीय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
Crime News : मुंबईत ग्रँट रोड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका हॉटेलमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करताना एका 41 वर्षीय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला. पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता पोलिसांनी या प्रकरणात मोठी अपडेट दिली आहे.
ADVERTISEMENT
पोलिस अधिकाऱ्यांना संशय आहे की मृत्यूचे कारण व्हायग्रा या शक्तीवर्धक गोळीचा ओव्हरडोस असू शकतो. मृत हा हॉटेलच्या खोलीत एका अल्पवयीन मुलीसोबत होता आणि मृत्यूपूर्वी त्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. शनिवारी, 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास त्याने हॉटेलमध्ये चेक इन केले आणि हॉटेल अधिकाऱ्यांना सांगितले की, अल्पवयीन मुलगी आपली मुलगी आहे. हे दाखवण्यासाठी त्याने अल्पवयीन मुलीचे बनावट आधार कार्डही बनवले होते.
हेही वाचा : Mumbai Crime News : 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करताना डायमंड फॅक्ट्रीच्या मॅनेजरचा मृत्यू! नेमका प्रकार काय?
कुटुंबासोबत मुंबईत येण्याच्या बहाण्याने मुलीला सोबत आणले
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी आणि मृत व्यक्ती हे सुरत येथे राहत होते. अल्पवयीन मुलीचे वडील अर्धांगवायू (पॅरालाइज्ड) आहेत आणि मृत हा त्यांचा मित्र होता, जो अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या उपचारात मदत करत होता. घरगुती खर्च होता. मृत व्यक्तीचे सुरतमध्येही एक कुटुंब आहे. शनिवारी 2 नोव्हेंबर रोजी तो अल्पवयीन मुलीला मुंबईला आपल्यासोबत घेऊन आला. दुपारी साडेतीन वाजता ते सुरतहून मुंबईला पोहोचले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
पोलिसांनी पुढे सांगितले की, त्यानंतर ते दक्षिण मुंबईतील डीबी मार्ग भागात गेले, जिथे त्यांनी अल्पवयीन मुलीचे बनावट आधार कार्ड घेऊन दुपारी 4 वाजता हॉटेलमध्ये चेक इन केले. त्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आणि काही वेळाने तो स्वतः बेशुद्ध पडला. या अल्पवयीन मुलीने हॉटेल कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली, त्यांनी डीबी मार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली.
पोलिसांना खोलीत सापडले महत्त्वाचे पुरावे
सूत्रांनी सांगितले की, अधिकाऱ्यांना खोलीत काही पुरावे सापडले ज्यामध्ये मृत व्यक्तीने अत्याचार करण्यापूर्वी व्हायग्राचे अतिसेवन केल्याचे आढळले. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत आरोपी सुरत येथील डायमंड पॉलिशिंग कंपनीत मॅनेजर होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT