पुण्यात लेकरासमोर पत्नीला मारलं ठार, कात्रीच खुपसली अन् नंतर Video केला व्हायरल
Pune Crime: कोर्टात स्टेनोग्राफर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुलासमोर पत्नीला कात्रीने मारले, व्हिडिओ केला व्हायरल

पुण्यातील खराडीमधील धक्कादायक घटना

कोर्टात काम करणाऱ्या व्यक्तीचं भयंकर कृत्य
Pune Crime News: पुणे: पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे घरगुती वादातून कोर्टात स्टेनोग्राफर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीची कात्रीने हत्या केली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पतीने या कृत्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो व्हायरल देखील केला आहे. त्यानंतर, व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. (a person working in pune court killed his wife with scissors in front of his son video also went viral)
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने जेव्हा खून केला तेव्हा त्याचा 5 वर्षांचा मुलगाही तिथे उपस्थित होता. पोलिसांनी सांगितले की, पत्नीचे नाव ज्योती शिवदास गीते आहे. सध्या चंदन नगर पोलिसांनी आरोपी पती शिवदास तुकाराम गीतेला अटक केली आहे.
हे ही वाचा>> पत्नीचे अश्लील फोटो काढले अन् मित्रालाच पाठवले, मित्राकडून महिलेकडे सेक्सची मागणी...
पती-पत्नीमध्ये नेहमी व्हायची जोरदार भांडण
बुधवारी सकाळी राहत्या घरात ही घटना घडली. शिवदास गीते हा मूळचा बीडचा राहणारा आहेत. तो कोर्टात स्टेनो म्हणून काम करतो आणि खराडी परिसरात भाड्याने राहत होता. दरम्यान, घरगुती कारणांमुळे पती-पत्नीमध्ये दररोज भांडणे होत असत.
बुधवारी सकाळीही दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून जोरदार भांडण झालं. ज्यानंतर आरोपी पती शिवदास याने अचानक पत्नी ज्योती हिच्या मानेवर घरातील कात्रीने वार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी असेही सांगितले की, आरोपी पती शिवदासला असा संशय होता की, त्याची पत्नी त्याची मालमत्ता हडप करेल. याच संशयावरून त्याने पत्नी ज्योती हिची हत्या केली.
हे ही वाचा>> Baramati News : अभ्यास करत नाही म्हणून बापाची मारहाण, मुलाचा मृत्यू; अंत्यसंस्काराआधीच पोलिसांनी...
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत. दरम्यान, ज्योती गीताचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला आहे. तिच्या मूळ गावी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.