Pune: 'तिच्यावर बलात्कार करून, हत्या कर..', सातवीच्या मुलाने दिली 100 रुपयांची सुपारी
Pune Crime: पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये एका सातवीमधील मुलाने आपल्या वर्गातील मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यासाठी नववीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाला 100 रुपयांची सुपारी दिल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सातवीतील मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यासाठी वर्गातील मुलानेच दिली सुपारी

सातवीमध्ये शिकणाऱ्या मुलाने नववीत शिकणाऱ्या मुलाला दिली 100 रुपयांची सुपारी

पुण्यातील दौंडमधील घटनेने एकच खळबळ
वसंत मोरे, पुणे: पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि सर्वांना हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. जिथे एका सातवीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने आपल्याच वर्गातील मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यासाठी नववीमध्ये शिकणाऱ्या एका मुलाला थेट 100 रुपयांची सुपारी दिली होती. दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर पुण्यात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एका शाळेत सुपारी दिल्याची ही घटना घडली. या घटनेप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक, वर्गशिक्षिका आणि एका महिला शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलाने वर्गातील मुलीवरच बलात्कार करून हत्या करण्यासाठी का दिली सुपारी?
दरम्यान, या सगळ्या प्रकाराची सुरुवात ही विद्यार्थिनीने वर्गशिक्षकाकडे केलेल्या एका तक्रारीमुळे झाली. मुलीने तिच्याच वर्गात शिकत असणाऱ्या एका विद्यार्थ्याबाबत वर्ग शिक्षकांकडे तक्रार केली होती. मुलाने त्याच्या पालकांची बनावट सही केल्याचं मुलीने वर्गशिक्षकांना सांगितलं होतं.
हे ही वाचा>> ठाणे: 4 जणांकडून महिला शिक्षकांचं लैंगिक शोषण, नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, बनावट सही करणाऱ्या विद्यार्थ्याला जेव्हा हे कळलं की, वर्गातील एका मुलीने त्याच्या वर्गशिक्षकांना त्याने केलेल्या कृत्याबाबत सांगितल आहे. तेव्हा तो प्रचंड संतापला. यासोबतच, विद्यार्थ्याला अशीही भीती वाटली की इतर लोकांना आता बनावट स्वाक्षरीबद्दल समजेल.
या सगळ्याचा राग येऊन विद्यार्थ्याने एक अत्यंत भीषण आणि संपूर्ण समाजाला अस्वस्थ करणार असं पाऊल उचललं.
हे ही वाचा>> बापाने आईचा गळा दाबला, पोरानं पाहिलं अन्... अनैतिक संबंधाच्या संशयामुळे हत्याकांड
तक्रार करणाऱ्या मुलीला कायमची अद्दल घडवावी या उद्देशाने मुलाने त्याच्या ओळखीतील नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला थेट वर्गातील त्या मुलीवर बलात्कार करून तिला ठार मारण्यास सांगितलं. ज्यासाठी त्याने त्याला 100 रुपयांची सुपारी देखील दिली.
शिक्षकांनी विद्यार्थिनीच्या तक्रारीकडे केलं दुर्लक्ष
दरम्यान, सुपारी दिल्याची माहिती एका दुसऱ्या विद्यार्थिनीने पीडितेला दिली होती. त्यानंतर तिने ही माहिती मुख्याध्यापकांना देखील दिली होती. परंतु मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले आणि याबाबत टाळाटाळ केली. यानंतर पीडितेने तिच्या घरी ही माहिती दिली. पीडितेच्या वडिलांनी प्रकरणाची माहिती मिळविण्यासाठी वर्गशिक्षक, पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी याबाबत योग्य उत्तर दिलं नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ दौंड पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणी तक्रार दाखल केली. मुलीने वेळीच ही बाब घरच्यांना सांगितल्याने पुढील अनर्थ मात्र टळला आहे.
सध्या, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकांना आदेश दिले आहेत. तथापि, विद्यार्थ्याने स्वतःच्या पालकांच्या खोट्या सह्या का केल्या? याबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही.