Salman Khan च्या फार्महाऊसमध्ये घुसखोरी, ‘ते’ दोघं नेमके कोण?
सलमान खानची चित्रपटसृष्टीतील दबंगगिरी सगळ्या जगाला माहिती असली तरी, त्याच्या फार्महाऊसवर दोघा युवकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याने सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ते दोघंही पंजाबमधील असल्याने आता पुन्हा एकदा बिश्नोई गँगची चर्चा होऊ लागली.
ADVERTISEMENT
Panvel Crime News : अभिनेता सलमान खान (Actor Salman Khan) याच्या न्यू पनवेलमधील वाजे गावामध्ये असलेल्या फार्म हाऊसवर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. त्या फार्महाऊसमध्ये (Farmhouse) दोघा युवकांनी (Young boy) प्रयत्न केल्या प्रकरणी त्या दोघांनाही पोलिसांनी आता अटक केली आहे. सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये परवानगी न घेता घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे अजेशकुमार ओमप्रकाश गिला आणि गुरु सेवक सिंग तेजा सिंग शीख या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता ते दोघंही पंजाबमधील (Panjab) असल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
दोघांवर संशय बळावला
या दोघांवरही सलमान खानच्या घरात परवानगी न घेता सुरक्षा भिंतीवरून उडी मारून आतामध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याचा त्या दोघांवरही आरोप ठेवण्यात आला आहे. त्या दोघांचाही संशय आल्याने सुरक्षारक्षाकाने त्यांना ज्यावेळी त्यांची नावं विचारली त्यावेळी त्यांनी चुकीचीही नावं सांगितली होती. त्यामुळे आणखी संशय बळावला आहे. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांची वेगळीच नावं असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता त्यांच्या गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.
हे ही वाचा >> ‘Reels बनवून नाचू नको..’ पतीने रोखलं, पत्नीने गळा आवळून जीवच घेतला!
नेमका हेतू काय?
सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये ज्या दोन तरुणांनी प्रयत्न केला होता, त्यांना ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. त्या दोघांनी कपांऊडला लावलेली तार तोडून फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्या दोघांनाही आता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांचा नेमका हेतू काय होता त्याची चौकशी करण्यात येत आहे.
हे वाचलं का?
बनावट आधार कार्ड
फार्म हाऊसवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याने त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी वेगळीच नावं सांगितली होती. पोलिसांनी ज्यावेळी त्यांना ताब्यात घेतले त्यावेळी मात्र त्या दोघांकडेही बनावट आधार कार्ड सापडली, त्यामुळे त्या दोघांविरोधातही गुन्हा दाखल करून चौकशी करण्यात येऊ लागली आहे.
कंपाऊंडची तार तोडली
दोघांकडेही बनावट आधारकार्ड असल्याचे समजल्यानंतर पोलिसांचा आणखी संशय बळावला त्यामुळे त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. न्यू पनवेलमधील वाजे गावातील अर्पिता फार्महाऊसची कंपाऊंडची तार तोडून झाडांच्या आधारे आतमध्ये प्रवेश करण्याचा त्या दोघांनी प्रयत्न केला होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Crime : विवाहित प्रियकराचा ‘त्या’ गोष्टीला नकार, संतापलेल्या प्रेयसीने कापला प्रायव्हेट पार्ट
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT