Beed : मशिदीत स्फोट घडवण्याआधी 'अंगार-भंगार नाय रं' गाण्यावर बनवला रील, 'त्या' दोन आरोपींची नावं समोर
Beed Georai Gelatin Blast : गेवराई तालुक्यात घडलेल्या या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. गावातील स्थानिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बीडच्या गेवराईमध्ये अर्धा मसला गावात मशिदीत स्फोट

स्फोट घडवण्यापूर्वी तरूणाने बनवला रील

रीलमध्ये तरूणाची हातात जिलेटीन घेऊन हवाबाजी
Beed Crime News : "शिस्तीत राहा बैट्या उडू नको जादा, मी अंगार-भंगार नाही रं..." एका हातात सिगोरेट, दुसऱ्या हातात जिलेटीन आणि हे गाणं लावलेला रील. हा व्हिडीओ समोर आला आहे बीडमध्ये मशिदीत झालेल्या स्फोटानंतर. गेल्या तीन महिन्यांपासून चर्चेत असलेलं बीड, पुन्हा एकदा मशिदीत झालेल्या स्फोटामुळे पुन्हा चर्चेत आलं आहे. कायद्याची भीती कुणाला आहे की नाही असा सवाल या घटनांमुळे निर्माण होतो आहे. कारण ज्या दोन तरुणांनी मशिदीमध्ये स्फोट घडवून आणला, त्यांनी रील बनवून व्हायरल केल्याचं दिसतंय.
रीलमध्ये काय दिसतंय?
हे ही वाचा >> Beed : मशिदीत जिलेटीनचा स्फोट, मध्यरात्री बीड जिल्हा हादरला, दोघे ताब्यात, घटना नेमकी काय?
अंधारात बसलेला एक तरूण मुलगा आपल्या हातात जिलेटीन घेऊन बसलेला दिसतोय. या रीलमध्ये तो मुलगा मोठ्या स्टाईलमध्ये सिगारेट पितोय. आपल्या हातातलं जिलेटीन तो एखाद्या खेळण्यासारखं हातळतोय. तसंच गा रीलला असलेल्या गाण्याच्याच स्टाईलमध्ये तो काहीतरी बोलतोय. बीडच्या गेवराईमध्ये असलेल्या अर्धामसला गावात ही घटना घडली.
आरोपी तरूणांची नावं समोर
बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धामसला या गावात मस्जिद मध्ये स्फोट झाल्याची घटना घडली. यातील आरोपी विजय गव्हाणे याने हा स्फोट घडवून आणण्यापूर्वी चक्क इंस्टाग्राम वर रील बनवल्याचं समोर आलं आहे. दरम्यान आता या प्रकरणात विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
रात्री 3 वाजता घडली घटना
गेवराई तालुक्यात घडलेल्या या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. गावातील स्थानिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. अर्धामसला गावातील मशिदीमध्ये मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास गावातील मशिदीमध्ये दोन युवकांनी जिलेटीनच्या कांड्या वापरून स्फोट घडवला. या घटनेमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच स्वतः पोलीस अधीक्षकांनी पहाटेच गाव गाठलं. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हे ही वाचा >> Nanded : व्हिडीओ कॉलवरुन विद्यार्थीनीचा विनयभंग, पिडितेच्या कुटुंबानं चोप दिल्यानंतर मुख्याध्यापकानं विष प्राशन...
बडे पोलीस अधिकारी बीडमध्ये
संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी सुद्धा घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. तलवाडा पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर बॉम्बशोधक पथक आणि फॉरेन्सिक पथकाकडून या ठिकाणी तपासणी करण्यात आली. पोलिसांनी सर्वांना शांततेचं आवाहन केलं आहे.