रेव्ह पार्टी, सापांचं विष.. ‘वर्षा’वर आरती करणारा एल्विश यादव नेमका कोण?
बिग बॉस ओटीटी-2 मध्ये एल्विश यादवने एक वेगळाच इतिहास रचला. एल्विशने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन त्याने बिग बॉसचा तो विजेता ठरला होता. मात्र आता त्याच्या रेव्ह पार्टीवरुन मात्र त्याला आता अनेक जणांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.
ADVERTISEMENT
Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी-2 चा (Big Boss OTT 2) विजेता आणि सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून अनेक लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा यूट्यूबर (you tuber) एल्विश यादव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो नेहमी चर्चेत आहे, मात्र आता पुन्हा एकदा तो वादग्रस्त गोष्टींवरुन चर्चेत आला आहे. सध्या त्याच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
विषाचा पुरवठा करणारी टोळी
एल्विशवर सापाच्या विषाचा पुरवठा करणाऱ्या टोळीशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांनाही अटक करण्यात आली आहे. ज्या 5 जणांना अटक करण्यात आली आहे, त्या प्रकरणात एल्विश यादवचाही सहभाग असल्यावरुन त्याचा आता तपास केला जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी केला होता जाहीर सत्कार
हरियाणातील गुरुग्राममध्ये राहणाऱ्या एल्विशने बिग बॉस जिंकल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासोबतही एका कार्यक्रमात तो सहभागी झाला होता. त्यावेळी सीएम खट्टर यांनी त्याचे खूप कौतुक केले होते. त्याच एल्विश यादवबद्दल आता जाणून घेऊया…
हे वाचलं का?
हे ही वाचा >>Elvish Yadav : रेव्ह पार्टीचा बेत, 5 कोब्रा अन् विष; Bigg Boss एल्विशवर गुन्हा
आई वडिलांची एकच इच्छा
एल्विश यादव हा हरियाणाचा आहे. हरियाणातील गुरुग्राम शहरामध्ये तो आपल्या कुटुंबासह राहतो. तिथेच त्याचे आलिशान घरही आहे. एल्विशचे त्याचे घर असले तरी, आता त्याने एक वेगळा फ्लॅट घेतला आहे. त्यामध्ये तो आणि त्याचा मित्र राहतो. तो ज्या मित्रासोबत असतो तो आणि एल्विश हे दोघं व्हिडीओ बनवत असतात. एल्विश हा बीकॉमचा विद्यार्थी असून त्याच्या कुटुंबीयांची इच्छा मात्र त्याने एखादी सरकारी नोकरी करावी अशी त्याच्या आई वडिलांची इच्छा आहे. पण एल्विश यादवला यूट्यूबचा नाद लागला आणि त्याने 2016 मध्ये त्याने स्वतःचे चॅनल सुरु केले.
आलिशान बंगलाही बांधला
एल्विश हा हरियाणातील असला तरी देशातील कानाकोपऱ्यातून त्याला प्रेम मिळाले आहे. कारण त्याच्या यूट्यूब चॅनलचेच सबस्क्रायबर 14 लाखापेक्षा जास्त आहेत. त्यावरून त्याचे देशभरात किती चाहते आहेत ते लक्षात येते. एका अहवालानुसार एल्विशची संपत्ती ही 2 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. तर आतापर्यंत एल्विश हा 50 कोटी रुपयांचा मालक असल्याचेही बोलले जात आहे. त्यातच सध्या त्याच्यासाठी एक आलिशान बंगलाही बांधला जात आहे. त्याला जशी आलिशान बंगल्याची आवड आहे, तशीच त्याला लक्झरी कारचीही आवड आहे. त्याच्याकडे पोर्श, ह्युंदाई, फॉर्च्युनर अशा अनेक कारही आहेत.
ADVERTISEMENT
वाइल्ड कार्ड एन्ट्री
बिग बॉस ओटीटी-2 मध्ये एल्विश यादवने एक वेगळाच इतिहास रचला. एल्विशने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन त्याने बिग बॉसचा तो विजेता ठरला होता. वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन जिंकणारा तो पहिलाच खेळाडू होता. बिग बॉस ओटीटी सीझन 2 जिंकल्यानंतर एल्विसला 25 लाखांचे बक्षीसही देण्यात आले होते. बिग बॉसमध्ये विजयी झाल्यानंतर मात्र त्याने आपल्या गावी लाइव्ह शोही केला होता. या शोमध्ये एल्विशला बघण्यासाठी 3 लाखांहून अधिक चाहते आले होते.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्र्यांनी केले तोंडभरुन कौतुक
एल्विशच्या स्टारडममुळेच त्याचे अभिनंदनाच्या कार्यक्रमात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री खट्टर यांनी त्याचे तोंडभरुन कौतुक केले होते. त्याच्या त्या अभिनंदनाच्या कार्यक्रमामध्ये मनोहर लाल खट्टर यांनी एक घोषणा केली होती की, हरियाणा सरकारद्वारे 1 नोव्हेंबर रोजी म्हणजेच हरियाणा दिनदिवशी राज्यस्तरीय टॅलेंट हंट कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
हे ही वाचा >> Manoj Jarange : जरांगेंची प्रकृती कशी? डॉक्टर म्हणाले, “किडनी, लिव्हरला…’
खंडणीसाठी धमकी
काही दिवसांपूर्वी एल्विश यादवकडून खंडणीही मागण्यात आली होती. एल्विशला खंडणीचा कॉल आल्यानंतर त्या प्रकरणी 25 ऑक्टोबर रोजी गुरुग्रामच्या सेक्टर-53 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी एल्विशने पोलिसांना सांगितले होते की, मला अनोळखी नंबरवरून 1 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मला धमकी देण्यात आल्याचे सांगितले होते.
सापांचे विष नशेसाठी
पोलिसांनी नोएडामध्ये एका रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केल्यानंतर एल्विशच्या नावाचा त्यामध्ये समावेश असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या पार्टीमध्ये विषारी सापांचे विष नशेसाठी वापरले जाणार असल्याचेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले होते. नोएडा पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये बिग बॉस विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादवचे नावाचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगताच जोरदार खळबळ उडाली.
मनेका गांधींचं कनेक्शन काय?
या प्रकरणी भाजप खासदार मनेका गांधी यांच्या पीपल फॉर अॅनिमल्स या संस्थेत काम करणाऱ्या गौरव गुप्ता यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये असाही आरोप केला आहे की एल्विश यादवला नोएडा आणि एनसीआरच्या फार्म हाऊसमध्ये जिवंत सापांसह त्याचे व्हिडीओ शूट केले जातात. हे करत असतानाच रेव्ह पार्ट्यांमध्येही सापाच्या विषाचा वापर केला जात असल्याचा आरोप करुन याप्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे.
हे ही वाचा >>‘विषारी नशाबाजांचा ‘वर्षा’वर सुळसुळाट’, एल्विशवरुन विरोधकांचा मुख्यमंत्र्यांना घेराव
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT