भाजप नेत्याची भररस्त्यात गोळी झाडून निर्घृण हत्या, नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

bjp leader pramod yadav murder
bjp leader pramod yadav murder
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजप नेत्याची भररस्त्यात निर्घृण हत्या

point

भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या

UP Crime : उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये (Jaunpur) भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद यादव (Pramod Yadav)  यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रमोद यादव यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

ADVERTISEMENT

प्रमोद यादव यांनी 2012 ची विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर जौनपूरच्या मल्हानी मतदारसंघातून शक्तिशाली धनंजय सिंह (Dhananjay Singh) यांच्या पत्नी जागृती सिंह यांच्या विरोधात लढवली होती. 

हे ही वाचा >>प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे-पवारांसमोर ठेवली 'ही' अट, तब्बल...

मात्र या निवडणुकीत समाजवादी पार्टीचे पारसनाथ यादव विजयी झाले होते, तर जागृती सिंह दुसऱ्या स्थानावर होत्या. मात्र, 2017 मध्ये धनंजय आणि जागृती यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर धनंजयने तिसरे लग्न श्रीकला रेड्डी यांच्याशी केले, जे सध्या जौनपूरच्या जिल्हा पंचायत अध्यक्ष आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

bjp leader pramod yadav murder

प्रमोद यादव यांच्या हत्या झाल्यानंतरही अजूनही कोणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत असून त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आले आहे.  प्रमोद यादव यांच्यावर जौनपूरच्या बक्सा पोलीस स्टेशन हद्दीतील बोधापूर वळणावर ही घटना घडली आहे.  

हे ही वाचा >> फडणवीस दिल्लीत पोहचताच म्हणाले, 'दोन्ही साथीदारांना...'

एकीककडे प्रमोद यादव यांची हत्या झाली तर दुसरीकडे गेल्या बुधवारीच माजी खासदार धनंजय सिंह यांना अपहरण आणि खंडणी प्रकरणी 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याचबरोबर खासदार-आमदार न्यायालयाकडून त्यांना 50 हजार रुपयांचा त्यांना दंडही  ठोठावण्यात आला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT