Suresh Dhas: "आका आणि वरिष्ठ आकांच्या जीवावर गांजा, चरस, देशी-विदेशी रिव्हॉल्वर...", सुरेश धसांचं खळबळजनक विधान!
Suresh Dhas On Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडालीय. देशमुखांची हत्या होऊन महिना उलटला असून याप्रकरणी सीआयडीने (SIT) ने सहा आरोपींना अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सुरेश धसांची खळबळजनक माहिती

"जे पिस्तुल विकायचे, त्यातलं कमिशनसुद्धा आकाकडे..."

पैठणच्या जनआक्रोश मोर्चात सुरेश धस नेमकं काय म्हणाले?
Suresh Dhas On Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडालीय. देशमुखांची हत्या होऊन महिना उलटला असून याप्रकरणी सीआयडीने (SIT) ने सहा आरोपींना अटक केली आहे. अशातच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आरोपी वाम्लिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत. पैठणच्या जनआक्रोश मोर्चात जनतेशी संवाद साधताना धस यांनी वाल्मिक कराड यांच्यावर टीका केली. धस म्हणाले, "संतोष देशमुख आणि सोमनात सूर्यवंशी या दोघांच्या बाबतीत अतिशय चुकीचं घडलेलं आहे. बीड प्रकरणात आठ पानी रिपोर्टमध्ये खूप गंभीर बाबी समोर आल्या आहेत. इतकं चुकीच्या पद्धतीनं कधीच कुणाला मारलं नाही. हे कशामुळे होतंय..तर हे परळीकर जे आका आणि त्यांचे आका आहेत. यांचे वेगवेगळे उद्योग आहेत. परळीत इराणी समाजाचे काही लोक आहेत. हे या दोघांच्या जीवावर गांजा, चरस, देशी-विदेशी रिव्हॉल्वर विक्री करतात. या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती आका करीत होते. जे पिस्तुल विकायचे, त्यातलं कमिशनसुद्धा आकाकडे पोहोचलं पाहिजे, अशाप्रकारची एक सिस्टिम होती".
सुरेश धस पुढे म्हणाले, "थर्मलमधील भंगार रोज चोरीला जातं. त्या चोरीच्या भंगारात पोलिसांचा वाटा आणि त्यानंतर आकाचा वाटा..एसटी महामंडळातील अनेक एसटीतलं काही चोरतील, त्यावरही लक्ष ठेवायला पोलीस आणि त्या पोलिसांनी आकाला जाऊन भेटायचं..असा एक प्रघात त्या परळीत होता. करुणा मुंडे असोत किंवा डॉक्टर देशमुख असोत, त्यांच्यावर खोट्या अॅट्रोसिटी दाखल करायच्या. दुसरीच 354 ची फिर्याद द्यायची आणि त्यांचं चारित्र्यहनन करायचं..करुणा मुंडेच्या गाडीत बुरखा घालून आलेली ती महिला नाही..पोलीस आहे पोलीस..आणि त्या पोलिसाचं नाव आहे संजय सानप. इतर समाजबांधवातला कोणताही पदाधिकारी जर आका आणि त्यांच्या आकांनी कोणत्या पदावर नेमला, तर त्यांनी फक्त सयाजीराव व्हायचं. बाकी त्यांना काडीचाही अधिकार नाही".
हे ही वाचा >> Nagpur : चिकन खाल्ल्यामुळे एक वाघ आणि 3 बिबट्यांचा मृत्यू? बर्ड फ्लूची शंका, नागपूरमध्ये नेमकं काय घडलं?
"परळी शहरातले पोलीस आका आणि वरिष्ठ आका यांच्या इशाऱ्यावर सगळं काही गोळा करायचं काम करतात. यामध्ये जुने नवे थर्मल पॉवर स्शेन असो, सिमेंट फॅक्ट्री असो, छोट्या मोठ्या कंपन्यांकडून हफ्ता घ्यायचा. यांच्या हफ्त्याला वैतागून कोरोमंडळ नावाची कंपनी विकून निघून गेला. कंपनी विकून त्याने नमस्ते लंडन केला आणि थेट त्याच्या राज्यात निघून गेला. मी जे आरोप करतोय त्यांच यांनी उत्तर द्याव. एक आका आत गेले आहेत. दुसरे आका बाहेर आहेत. बाहेर असलेल्या आकांशी या प्रश्नांची उत्तर द्यावी, असं माझं मत आहे. पोलिस दलातील कर्मचारी जर आका आणि त्यांचे आका यांचंच ऐकून काम करत असतील, तर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, टीव्ही चॅनेलवरील सीआयडीतले पोलीस, सावधान इंडिया मालिकेतील कलाकार, मला वाटतंय यांचीच नियुक्ती परळीला करावी", असंही सुरेश धस म्हणाले.