प्रियकराने सोशल मीडियावर प्रेयसीचे अश्लील फोटो केले व्हायरल, पण...

मुंबई तक

एका तरूणाने त्याच्या प्रेयसीचे काही फोटो हे थेट सोशल मीडियावर व्हायरल केले. ज्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीला पकडून त्याला थेट पोलिसांच्या हवाली केलं.

ADVERTISEMENT

प्रियकराने सोशल मीडियावर प्रेयसीचे अश्लील फोटो केले व्हायरल
प्रियकराने सोशल मीडियावर प्रेयसीचे अश्लील फोटो केले व्हायरल
social share
google news

झाशी: उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने त्याच्या प्रेयसीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. जेव्हा हे फोटो मुलीच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचले तेव्हा कुटुंबात एकच गोंधळ उडाला. ही बाब उघड होताच, आरोपी गावात आला तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी त्याला पकडले आणि बेदम मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले.

खरंतर, हे प्रकरण झाशीच्या मोंथा पोलीस स्टेशन परिसरातील एका गावातील आहे. या गावातील एका मुलीची झाशीतील राजवेंदर नावाच्या तरुणाशी मैत्री झाली, जी हळूहळू प्रेमसंबंधात रूपांतरित झाली. यादरम्यान, आरोपीकडे मुलीचे अश्लील फोटो आले, जे त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर व्हायरल केले. जेव्हा हे फोटो मुलीच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचले तेव्हा त्यांना प्रचंड धक्का बसला.

हे ही वाचा>> Mumbai : मुंबई पोलिसांकडून मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, हिंदी मालिकेतील अभिनेत्रीला...

गावकऱ्यांनी आरोपीला घेरलं अन्...

दरम्यान, रविवारी आरोपी तरुण गावात आला तेव्हा मुलीच्या कुटुंबाला याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच त्याला पकडले आणि रागाच्या भरात त्याला बेदम मारहाण केली. यानंतर, त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आणि आरोपीविरुद्ध लेखी तक्रार दाखल करण्यात आली. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, आरोपी बऱ्याच काळापासून त्यांच्या मुलीला त्रास देत होता आणि आता त्याने अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला. आरोपी गावात येत असल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्याला घेरले आणि त्याला चांगलाच चोप दिला.

हे ही वाचा>> Honeymoon वेळी झालेला पती-पत्नीचा मृत्यू, आता काकूने सांगितली नवी कहाणी

पोलिसांची कारवाई

पोलीस सर्कल ऑफिसर देवेंद्र नाथ यांनी सांगितले की, ही घटना मोंठा पोलीस स्टेशन परिसरातील अम्मारगड येथे घडली. जेव्हा तो तरुण गावात आला तेव्हा सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्यावरून वाद झाला, त्यानंतर गावकऱ्यांनी त्याला मारहाण केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात योग्य कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp