Yashashree Shinde Case Updates : दाऊद शेख सापडला! कुठे बसला होता लपून?

मुंबई तक

Yashashree shinde news : उरण येथील यशश्री शिंदे हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश आले आहे. फरार असलेला दाऊद शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

ADVERTISEMENT

यशश्री हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख याच्या मुसक्या आवळण्यात नवी मुंबई पोलिसांना अखेर यश आले.
यशश्री शिंदे हत्या प्रकरणात पोलिसांनी दाऊद शेख याला अटक केली.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट

point

हत्येचा आरोप असलेल्या दाऊद शेख अखेर सापडला

point

नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकात जाऊन आवळल्या मुसक्या

Yashashree Shinde News in Marathi : (दिपेश त्रिपाठी, मुंबई) उरण येथील २० वर्षीय यशश्री शिंदे हत्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांना अखेर मोठे यश मिळाले आहे. यशश्रीच्या हत्येचा आरोप असलेला दाऊद शेख हा घटनेच्या दिवसापासून फरार होता. त्याचा मोबाइलही बंद होता. महाराष्ट्रात आणि राज्याबाहेरही पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर दाऊद शेखच्या पोलिसांनी राज्याबाहेर जाऊन मुसक्या आवळल्या. हत्येच्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत आहे. (Yashashree Shinde murder case suspected accused Dawood shaikh detained by Navi Mumbai Police)

उरण येथील यशश्री शिंदे या २० वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह निर्जनस्थळी फेकण्यात आला होता. या प्रकरणी यशश्री शिंदेच्या आईवडिलांनी दाऊद शेख याच्यावर आरोप केलेले आहेत. 

Yashashree Shinde : दाऊद शेख कुठे होता?

यशश्री शिंदेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड तपासले. त्यात ती दाऊद शेख सोबत बोलत होती, हे समोर आले. त्यानंतर दाऊद शेखच्या नंबरवर पोलिसांनी कॉल केले, पण त्याचा नंबर बंद होता. 

महत्त्वाची बाब म्हणजे यशश्री शिंदे आणि दाऊद शेख या दोघांचे मोबाईल एकाच वेळी बंद झाल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते. 

हेही वाचा >> मांडीवर 22 शत्रूंची गोंदवली नावं, पण गुरु वाघमारेचा गर्लफ्रेंडनेच काढला काटा, Inside Story

Yashashree shinde case suspected accused Dawood shaikh detained by Navi Mumbai Police
यशश्री हत्या प्रकरणातील संशयित आरोपी दाऊद शेख. (निळ्या रंगाची टोपी घातलेला)

दाऊद शेख हा मूळचा कर्नाटकचा असल्याची माहिती पोलिसांना तपासातून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी एक पथक कर्नाटकात पाठवले होते. कर्नाटकातील गुलबर्गा येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 

मैत्रिणीकडे गेली अन् नंतर मृतदेहच मिळाला

यशश्री शिंदे ही 25 जुलै रोजी घरातून बाहेर पडली होती. मैत्रिणीकडे जात असल्याचे तिने कुटुंबियांना सांगितले होते. सायंकाळी 5 वाजेनंतर तिचा मोबाईल बंद येत असल्याने तिचा शोध सुरू केला होता. सगळीकडे चौकशी करून झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती.

हेही वाचा >> यशश्रीच्या मृतदेहाचे कुत्रे तोडत होते लचके; पोलीस पोहोचले त्यावेळी काय दिसलं? 

पोलिसांकडून यशश्री शिंदेचा शोध घेतला जात होता. दरम्यान, 26 जुलैची रात्र उलटून गेल्यानंतर म्हणजे 27 जुलै रोजी पहाटे 2 दोन वाजता पोलिसांना एक कॉल आला. त्या व्यक्तीने तरुणीचा मृतदेह पडलेला असल्याचे सांगितले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. 

यशश्रीच्या आईवडिलांना बोलवण्यात आले. त्यांनी कपड्यांवरून तो मृतदेह यशश्रीचाच असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दाऊद शेखचा शोध सुरू केला होता. 

हे वाचलं का?

    follow whatsapp