Dombivli VIDEO: चेष्टा सुरू असतानाच गेला जीव, तरुणाचा हात लागला अन् महिला एका झटक्यात...
Dombivli VIDEO: डोंबिवलीमध्ये एका महिला तिच्या सहकाऱ्यासोबत चेष्टा करत असताना अचानक तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. ज्यामध्ये तिचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
डोंबिवलीत महिलेचा मस्करीत गेला जीव
घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद
डोंबिवलीतील घटनेनं माजली खळबळ
Dombivli Woman Died Video: डोंबिवली: मित्रांसोबत मस्ती करणे डोंबिवलीत एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे. मित्रांबरोबर चेष्टा करता-करता महिलेने जीव गमावल्याची घटना डोंबिवलीतील विकास नाका परिसरात घडली आहे. मित्राबरोबर मस्करी सुरू असताना अचानक तोल गेल्या महिला थेट तिसऱ्या मजल्यावर खाली पडली आणि त्याताच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या महिलेसोबत मस्ती करणाऱ्या बंटी नावाच्या तरुणाला कसेबसे लोकांनी वाचवलं. आता या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. (dombivli video a woman life was lost while kidding with her colleague a young man hand was touched and woman fell directly on her head from third floor)
ADVERTISEMENT
महिलेसोबत नेमकं घडलं तरी काय?
डोंबिवली पूर्वेतील विकास नाका परिसरात ग्लोब स्टेट नावाची इमारत आहे. या इमारतीमधील एका कार्यालयात गुडियादेवी मनीष कुमार ही महिला साफसफाईचे काम करत होती. ती डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरात राहत होती. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
हे ही वाचा>> Vasai Murder: डोक्यात 15 वार, 30 सेकंदात खेळ खल्लास! Inside Story
आज इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गुडियादेवी ही तिच्या सहकाऱ्यांसोबत बसली होती. ते दोघेही इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर होते. पण ते जिथे बसले होते तिथे जिन्याचा कठडा हा छोटा होता. दोघेही त्या ठिकाणी बसलेले असताना त्यांच्यामध्ये चेष्टा-मस्करी सुरू झाली. गुडियादेवी सोबत बंटी नावाच्या सहकारी हा मस्ती करीत होता.
हे वाचलं का?
पण त्याचवेळीत थट्टा मस्करीमध्ये बटीचा हात गुडियादेवीला लागला. त्यामुळे गुडियादेवी हिचा चटकन तोल गेला आणि ती पाठमोरी थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. ज्यामध्ये गुडियादेवीचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. तर गुडियादेवी सोबत मस्ती करणारा बंटीचा देखील तोल गेला आणि तोही खाली कोसळला. पण इमारतीमधील इतर लोकांनी त्याला पकडल्याने त्याचा जीव कसाबसा वाचला.
हे ही वाचा>> Crime News: सून आंघोळ करताना सासरा शूट करायचा Video, अन् नंतर...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. आत्ता पोलिसांनी या प्रकरणात गुडियादेवी हिच्यासोबत असणाऱ्या बंटी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT