Girl Murder : परीक्षा देऊन निघाली होती घरी, भरबाजारात दोन तरुणांनी…

मुंबई तक

ADVERTISEMENT

a shocking incident a girl student was shot dead in the crowded market of Jalaun district in Uttar Pradesh on Monday afternoon.
a shocking incident a girl student was shot dead in the crowded market of Jalaun district in Uttar Pradesh on Monday afternoon.
social share
google news

अतिक अहमद आणि अशरफ अहमदच्या हत्येमुळे उत्तर प्रदेशची चर्चा पुन्हा एकदा देशभरात झाली. त्याच उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्था हा केंद्रस्थानी आली आहे. उत्तर प्रदेशात एक हादरवून टाकणारी घटना घडली असून, परीक्षा देऊन घरी जात असलेल्या तरुणीला दोन तरुणांनी भयंकर पद्धतीने संपवलं.

ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशातील जालौनमधील केईटी तालुक्यात थरकाप उडवणारी घटना घडली आहे. यात बीएचं शिक्षण घेत असलेल्या तरुणीचा जीवच गेला. परीक्षा देऊन घरी जात असलेल्या तरुणीची मोटारसायकलवर आलेल्या दोन तरुणांनी भर बाजारात गोळ्या घालून हत्या केली. या घटनेनंतर हल्लेखोर पिस्तुल घटनास्थळी टाकून फरार झाले.

पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी तरुणीची गोळ्या घालून हत्या केली, ते ठिकाण पोलीस ठाण्यापासून जवळच होतं. ही तरुणी इट ठाणे हद्दीत येणाऱ्या अंधागावची होती. 22 वर्षीय रोशन अहिरवार सोमवारी (17 एप्रिल) ईटीच्या राम लखन पटेल कॉलेजमध्ये बीएची परीक्षा देण्यासाठी आली होती.

हे वाचलं का?

हेही वाचा >> राष्ट्रवादीच्या मेळाव्याला अजितदादांची गैरहजेरी ‘हे’ आहे कारण

परीक्षा देऊन झाल्यानंतर रोशनी घरी निघाली होती. त्याचवेळी बाईकवरून दोन तरुण आले. त्यांच्याकडे पिस्तुल होते. त्यातील एका तरुणाने पिस्तुलातून रोशनीवर डोक्यात गोळी झाडली. ज्यामुळे रोशनी जागेवरच गतप्राण झाली.

हेही वाचा >> सुनील केदार यांचा बावनकुळेंना धोबीपछाड; नागपूरमध्येच दिला मोठा धक्का

भरदिवसा झालेल्या या घटनेने परिसरात दहशत पसरली. त्याचवेळी काही लोकांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तुल जागेवर टाकून फरार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. या प्रकरणाचा तपास आता पोलीस करत आहे.

ADVERTISEMENT

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

गोळी लागल्यानंतर तरुणी जागेवरच ठार झाली. काहींनी हा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर विरोधकांनीही यावरून योगी आदित्यानाथ यांच्या सरकारवर टीका केली आहे.

ADVERTISEMENT

अतिक अहमद-अशरफच्या हत्येनं यूपीत खळबळ

प्रयागराज येथे पोलिसांच्या ताब्यात असताना कुख्यात गुंड आणि माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अतिक आणि अशरफला वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले होते. त्याचवेळी तिघांनी अगदी जवळून त्यांना गोळ्या घातल्या. या घटनेची चर्चा देशभरात झाली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT