अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला! लैंगिक अत्याचार करून खून झाल्याचा संशय, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

The sexual assault of two girls has sparked outrage in Badlapur. (Representative Image)
The sexual assault of two girls has sparked outrage in Badlapur. (Representative Image)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

त्या अल्पवयीन मुलीचा शोध सुरु होता, पण...

point

कोल्हापूरमध्ये घडली धक्कादायक घटना

point

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय

दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर

ADVERTISEMENT

Kolhapur Crime News: बदलापूरच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले असतानाच कोल्हापूरमध्येही एक धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी रात्री राम नगर परिसरातील बिहारी कुटुंबातील एक १० वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती. परंतु, कोल्हापूर शहरातील शिये परिसरात आज सकाळी उसाच्या शेतीत एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयीत आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

त्या अल्पवयीन मुलीचा शोध सुरु होता, पण...

मिळालेल्या माहितीनुसार, शिये जवळच्या राम नगर परिसरातील शेतवाडीत एका दहा वर्षीय मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला. या मुलीवर लैंगिक अत्याचार करून, त्या मुलीचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही अल्पवयीन मुलगी बुधवारी दुपारपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी शिरोली एमआयडीसी पोलिसात दिली होती. त्यानुसार काल दुपारपासूनच त्या अल्पवयीन मुलीचा शोध सुरू होता. स्थानिक नागरिकही या मुलीच्या शोधासाठी प्रयत्नशिल होते. अखेर आज सकाळी मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी श्वान पथकं आणलं.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Sharad Pawar: "बदलापूरची घटना राज्य सरकारचं..."; शरद पवार नेमकं काय म्हणाले? 

श्वानानं मुलीच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतापर्यंतचा माग काढला. तो परिसर पिंजून काढल्यानंतर, मुलीचा मृतदेह दिसून आला. मृतदेहापासून जवळच मुलीचे चप्पल, काही कपडे दिसून आले. त्यामुळं लैंगिक अत्याचार करून या मुलीचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना आज संपूर्ण कोल्हापूर जिल्हयात वार्‍यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कोल्हापुरात आले असतानाच, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित तातडीनं घटनास्थळी आले. त्यांनी तपासाबद्दल पोलिसांना सूचना दिल्या.

हे ही वाचा >> Nepal Bus Accident: नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 14 जण ठार; काठमांडूला जाताना बस कोसळली नदीत

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT