शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर सलग 2 महिने बलात्कार, तब्बल 9 वर्षांनंतर अटक!
Rape Case: आठवी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या एका महिला शिक्षिकेला अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT
वॉश्गिंटन: एका महिला शिक्षिकेवर तिच्या विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिला शिक्षिकेने (Lady Teacher) अल्पवयीन विद्यार्थ्याचे दोन महिन्यांहून अधिक काळ शोषण केले. आता तिच्यावर लैंगिक छळ आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण अमेरिकेतील डेलावेअर या राज्यातील आहे. (female teacher sexually assaulted a minor student arrested after 9 years)
ADVERTISEMENT
42 वर्षीय आरोपी महिला शिक्षिकेचे नाव रीड मेसर असे आहे. ती आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत शिकवायची. अलीकडेच, दक्षिण कॅरोलिना पोलिसांनी एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली तिला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
nypost ने दिलेल्या वृत्तानुसार, राज्य पोलिसांच्या गुन्हेगारी तपास युनिटला 23 डिसेंबर 2022 रोजी फॅमिली सर्व्हिसेसच्या डेलावेर विभागाकडून एक रिपोर्ट प्राप्त झाला. यामध्ये शिक्षिका रीड मेसर हिच्यावर साधारण नऊ वर्षांपूर्वी एका विद्यार्थ्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> पोलीस जावयाला, पोलीस सासऱ्याने घडवली जन्मभराची अद्दल.. आता भोगावी लागणार जन्मठेप!
पोलिसांनी सांगितले की, तपासकर्त्यांना असे आढळून आले आहे की, लैंगिक शोषण हे ऑक्टोबर 2014 मध्ये सुरू झाले आणि साधारण दोन महिने हा सगळा प्रकार सुरू होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर 26 एप्रिल 2023 रोजी रीड मेसर हिच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले. यानंतर पोलिसांनी मेसरला तिच्या घरातून अटक केली.
हे ही वाचा >> Husband-Wife: ‘नवऱ्याने बेडरूममध्ये लावलाय CCTV कॅमेरा’, बायको म्हणाली; त्याला…
तिच्यावर लैंगिक छळ, बलात्कार, असभ्य वर्तन असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तिला शाळा प्रशासनाने देखील तात्काळ शाळेतून काढून टाकण्यात आलं आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत शाळा व्यवस्थापनाने ही कारवाई केली आहे. सध्या या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सध्या, न्यायालयाने मेसरला बाँडवर सुधारगृहात पाठवले आहे. मात्र, अमेरिकेतील अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ज्यामध्ये महिला शिक्षकांना बरीच कठोर शिक्षा झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे रीड मेसरला देखील अशीच शिक्षा केली जावी अशी आता मागणी केली जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT