पत्नी परपुरुषासोबत नको त्या अवस्थेत दिसली, संतापलेल्या पतीने…
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे नवऱ्याला समजले होते. त्यामुळे त्याने पत्नीच्या प्रियकराला संपवण्याचा घाट रचला. तसा त्याने प्लॅनही केला. त्यामुळे पत्नीलाच प्रियकराला बोलवायला सांगितले आणि पुढच्या प्लॅनप्रमाणे त्याने त्याचा काटा काढला.
ADVERTISEMENT

UP Murder: उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये एका व्यक्तीच्या हत्येचा (Murder Case) तपास करताना दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपी दर्शन सिंह याची पत्नी रामविलाससोबत नको त्या परिस्थिती सापडली होती. त्या प्रकरणातूनच हत्या झाल्याचे उघड झाले आहे.
अनैतिक संबंधातून झाली हत्या
फिरोजाबाद ज्या रामविलासची हत्या करण्यात आली होती. त्या रामविलासचे दर्शन सिंह याच्या पत्नीबरोबर अनैतिक संबंध होते. ही माहिती दर्शन सिंहला समजली होती. त्यामुळे त्याने पत्नीला सांगून रामविलासला घरी बोलवायला सांगितले होते. त्यानंतर दर्शन सिंहने त्याची घरी बोलवून हत्या केली होती, आणि त्यानंतर त्याच्या मृतदेहाचीही विल्हेवाट लावली होती. त्यानंतर ही घटना पोलिसांना समजल्यानंतर ही हत्या अनैतिक संबंधातूनच झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पत्नीला सांगून काढला काटा
या प्रकरणाचा तपास केल्यानंतर आरोपी दर्शन सिंह आणि त्याच्या भावाला अटक करण्यात आली आहे. दर्शन सिंहला आपल्या पत्नीचे रामविलाससोबत शारीरिक संबंध असल्याचे समजले होते. त्यामुळे ही हत्या झाल्यानंतर आता आरोपी दर्शनची पत्नीही फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र तिलाही लवकरच अटक करण्यात येईल असंही यावेळी सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा >> घरासमोरच पोलीस अधिकाऱ्यावर झाडल्या गोळ्या, तपासात झाली धक्कादायक माहिती उघड
घरात रक्ताचा सडा
ही हत्या झाल्यानंतर ग्रामस्थांनी सांगितले की, दर्शन सिंहचे कुटुंब एक दिवस अचानक गावातून बेपत्ता झाले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी दर्शन सिंहचे घराचे दार तोडण्यात आले. त्यावेळी घरातील दृश्य पाहून अनेकांना धक्काच बसला. कारण घरात सगळीकडे रक्ताचे डाग दिसत होते. भिंतीवरही रक्ताचा सडा पडला होता. त्यामुळे पोलिसांनी तपासासाठी घरातील एक वीटही घेतली होती.
मृतदेहाची अशी लावली विल्हेवाट
पोलिसांनी या हत्येचा तपास करताना सांगितले की, रामविलासची हत्या करण्यासाठी दर्शनच्या पत्नीलाच त्याला घरी बोलवण्यास सांगितले होते. त्यानंतर दर्शन आणि त्याच्या भावाने प्लॅन करुन रामविलासची हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला.