Salil Ankola : भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह, पुण्यात काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

former cricketer salil ankola mother found dead in pune house police investigate shocking crime story
सलील अंकोला यांच्या आईचा संशयास्पदरीत्या मृत्यू
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सलील अंकोला यांच्या आईचा संशयास्पदरीत्या मृत्यू

point

घरात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

point

पुण्यातल्या राहत्या घरात घडली घटना

Salil Ankola Mother Dead : क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरसोबत डेब्यु करणाऱ्या भारतीय संघाच्या माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. माला अशोक अंकोला (वय 77) असे मृत महिलेचे नाव आहे. रक्ताच्या थारोळ्यात बंद खोलीत त्यांचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या आहे? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करतायत. (former cricketer salil ankola mother found dead in pune house police investigate shocking crime story)
 
 पुण्याच्या प्रभात रोडवरील आदी नावाच्या सोसायटीत सलील अंकोला यांच्या आई माला या त्यांच्या लेकीसोबत राहत होत्या. लेक कामावर गेल्यावर त्या नेहमी घरी एकट्या असायच्या. दरम्यान आज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे कामवाली बाई त्यांच्या घरी घर कामासाठी आली होती. तिने घराचा दरवाजा ठोठावला असता आतून काहीच प्रतिक्रियाा आली नाही. त्यानंतर कामवाली बाईने वॉचमनला बोलावून दरवाजा ठोठावण्यास सांगितले, मात्र घरातून काहीच प्रतिक्रिया आली नाही. त्यानंतर कामवाली बाईने महिलेच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली आणि पोलिसांना देखील बोलावून घेतले. 

हे ही वाचा : Cabinet Meeting Desicion: जैन समाजासाठी महामंडळ, मंत्रिमंडळ बैठकीतील 33 निर्णय जसेच्या तसे

पोलिसांनी घटनास्थळी येऊन ज्यावेळेस दरवाजा तोडला त्यावेळेस माला या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्याच्या मानेवर धारदार चाकूचे वार होते. दरम्यान ही हत्या आहे की आत्महत्या आहे,  हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. आता पोस्टमार्टम रिपोर्टमधून या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांनी सूरू केला आहे. 

दरम्यान या दु:खद घटनेनंतर सलील अंकोला यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून गुड बाय मॉम असे म्हटले आहे. तसेच सलील अंकोला  माजी भारतीय क्रिकेटपटू असून 1989 ते 1997 या कालावधीत त्याने भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. सलीलने भारतासाठी एक कसोटी सामना व 20 एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात योगदान दिलं आहे. आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात देखील सलीलने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत केली होती. सध्या सलील अंकोलाचे कुटुंब पुण्यात राहत असून आज त्याच्या आईचा मृतदेह पुण्यातील घरात आढळून आला. या घटनेने क्रिकेट वर्तुळात हळहळ व्यक्त होतं आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'या' महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाही, कारण...

    follow whatsapp

    ADVERTISEMENT