Baba Siddique Death : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा मुख्य सूत्रधार कोण? धक्कादायक माहिती आली समोर 

मुंबई तक

ADVERTISEMENT

Baba Siddiqui Murder Latest Update
Who Killed Baba Siddiqui
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कुणी केली बाबा सिद्दीकींची हत्या?

point

दिल्ली पोलिसांचं विशेष पथक मुंबईत येणार?

point

सिद्धीकींच्या हत्येच्या घटनेत कोणकोणत्या शूटर्सचा सहभाग?

Who Killed Baba Siddique : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर वांद्र्यात काल शनिवारी (12 ऑक्टोबर) रात्री गोळीबार झाला. या गोळीबारीच्या घटनेमुळं सिद्दीकींचा लिलावती रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला. सिद्दीकींच्या हत्येमुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. परंतु, या हत्येमागे मूख्य सूत्रधार कोण आहे? पोलीस याबाबत कसून तपास करत आहेत. यासाठी दिल्ली पोलिसांचं विशेष तपास पथक मुंबईला येणार असल्याचं समजते. बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन बिश्नोईचा हात असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. तसच या सिद्धीकींच्या हत्येमागे कोणकोणत्या शूटर्सचा सहभाग आहे, याचाही पोलिसांकडून तपास सुरु आहे. (NCP leader Ajit Pawar and former minister Baba Siddiqui was shot at in Bandra last Saturday (October 12) night. Siddiqui died during treatment at Lilavati Hospital due to this firing incident)

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>  Baba Siddique: राजकीय प्रवास ते बॉलिवूड कनेक्शन! बाबा सिद्दीकींबद्दल माहित नसलेल्या 'त्या' गोष्टी...

लॉरेन बिश्नोईने NIA ला दिली होती कबुली

बॉलिवूड अभिनेता सलमान खान लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर आहे, अशी कबुली बिश्नोईने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) दिली होती. सलमान खान हिटलिस्टमध्ये नंबर वन असल्याचं बिश्नोईनं एनआयएला सांगितलं होतं. 1998 मध्ये सलमान खानने एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जोधपूरमध्ये काळवीटची शिकार केली होती. बिश्नोई समाज काळवीटची पूजा करतो. याच कारणामुळे लॉरेन सलमानची हत्या करण्याचा प्रयत्न करतोय.

हे ही वाचा >> Baba Siddique : 'बाबा सिद्दीकी' यांची हत्या करणारे ते तीन शूटर्स कोण? Photo आला समोर

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसारखी गँग सरु केलीय- NIA

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसारखंच लॉरेन्स बिश्नोईने त्याची गँग सुरु केली आहे. एनआयएने आरोपत्रात खुलासा केला आहे की, लॉरेन्स बिश्नोई आणि त्याची गँग अनेक राज्यात पसरली आहे. त्याच्याकडे 700 हून अधिक शूटर्स आहेत. एनआयएने दावा केला आहे की, बिश्नोई आणि त्याची गँग अशाप्रकारे वाढत आहे, ज्याप्रकारे 1990 मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने गँगवार सुरु केला होता.

हे वाचलं का?

बाबा सिद्दीकी काँग्रेस सोडण्यापूर्वी ते मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष आणि वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. सुरुवातीच्या काळात ते विद्यार्थी चळवळीत होते. 1980 मध्ये त्यांना वांद्रे युवक काँग्रेसचे सरचिटणीस बनवण्यात आले आणि चार वर्षांनी ते अध्यक्ष झाले. 1988 मध्ये ते मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT