Badlapur Crime: मंत्री गिरीश महाजन बदलापूर स्टेशनवर आले अन्... वाचा जे घडलं ते!
girish mahajan gives big statement on badlapur minor girl sexual assault case central railway update
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बदलापूर अत्याचार प्रकरणावर गिरीश महाजनांची मोठी प्रतिक्रिया
गिरीश महाजनांनी आंदोलकांना केलं आश्वस्त
गिरीश महाजन माध्यमांशी बोलताना नेमकं काय म्हणाले?
Girish Mahajan On Badlapur Crime: बदलापूरमध्ये आदर्श विद्यालयात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घडला घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन केलं असून पोलिसांवरही दगडफेक केली आहे. या आंदोलनाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी बदलापूरमध्ये आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, संतापलेल्या नागरिकांनी ठिय्या आंदोलन कायम ठेवलं आहे.(Angry citizens staged a sit-in protest at Badlapur railway station and pelted stones at the police. Railway services have also been affected by this movement. Against this backdrop, BJP leader and minister Girish Mahajan tried to convince the protesters in Badlapur)
ADVERTISEMENT
माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन काय म्हणाले?
या घटनेबाबत काही दिवसांतच तपास पूर्ण होईल. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल. या प्रकरणी एसआयटी नेमली गेली आहे. हे प्रकरण सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे असणार आहे. या आंदोलनात कुणाचंही नेतृत्व नाही. कुणीही कुणाचं ऐकत नाही. तरुणांना राग येणे योग्य आहे. पण त्यामुळे रेल्वेसेवा बंद ठेवायची हा त्यामागचा उपाय नाही.
आम्ही त्यांना विनंती करत सांगितलं की प्रशासनाने आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. विशेष तपास पथक नेमण्यात आलं आहे. पोलीस अधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबीत केलं आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये टाकलं आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची या प्रकरणासाठी नियुक्ती करत आहोत. ही केस लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये चालवून जो आरोपी आहे, त्याला लवकरात लवकर शिक्षा देणार आहोत.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Badlapur Thane School case : 'फाशी... फाशी..' 7 तास बदलापूरकर रेल्वे ट्रॅकवर, एक इंचही मागे हटायला नाही तयार!
रेलरोको आंदोलन मागे कसं घेणार? यासाठी प्रशासन काय करणार? या प्रश्नाचं उत्तर देताना महाजन म्हणाले, मी त्यांना विनंती केली आहे. आणखी थोडावेळ वाट पाहू. मला वाटतं यातून नक्कीच उपाय निघेल. या आंदोलनात कुणाचं नेतृत्व नाही. सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणाहून जमले आहेत. त्यामुळे इथं कुणाशी बोलावं हेच समजत नाही. लाखो प्रवाशांना घरी जायचं आहे.
मुलं, विद्यार्थी, रुग्ण, डॉक्टर आहेत. लोक म्हणतात, आरोपीला इथच आणा, आम्ही त्याला मारून टाकतो. पण कायद्यात अशी तरतूद नाही. घडलेली घटना अतिशय संतापजनक आहे. शासनाच्या मनातही तेव्हढाच राग आहे. पण त्याला कायद्याने शिक्षा द्यावी लागेल. कसाबने एव्हढे लोक मारले. पण त्याला शिक्षा द्यायला दोन-तीन वर्ष लागले. शेवटी त्याला फासावर लटकवलं आपण. म्हणून मला असं वाटतं कायद्यानं चालावं लागेल.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Badlapur News LIVE: बदलापूरकर उतरले रेल्वे ट्रॅकवर, लोकल ठप्प.. कुठपर्यंत सुरू आहेत ट्रेन?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT