Crime : इंस्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बलात्कार अन्…, अल्पवयीन मुलीसोबत भयानक घटना
कानपुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका मुलीवर तिच्याच मित्रांनी गॅंगरेप केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मुलीवर जबरदस्तीने धर्म परीवर्तनाचा दबाव टाकल्याचाही प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आता तरूणीने पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
कानपुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका मुलीवर तिच्याच मित्रांनी गॅंगरेप केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मुलीवर जबरदस्तीने धर्म परीवर्तनाचा दबाव टाकल्याचाही प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आता तरूणीने पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. (instagram friend gangrape with friend in guest house kanpur kalyanpur case crime news)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, कानपुरच्या गावात राहणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीची झांसीच्या राहणाऱ्या एका तरूणासोबत इंस्टाग्रामवर मैत्री झाली होती. काही दिवसांतच दोघांमधली ही मैत्री इतकी घट्ट झाली होती की, मुलीने तिचे काही फोटो मित्राला शेअर करायची. मात्र मुलीला हे फोटो शेअर करणे चांगलेच महागात पडले आहे. कारण तिच्या या मित्राने आता फोटो एडीट करून तिचा एक अश्लील व्हिडिओ बनवला होता. हा अश्लील व्हिडिओ बनवून आरोपीने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आहे.
हे ही वाचा : Crime: शाळेत मुलींच्या बाथरूममध्ये सीसीटीव्ही, पुण्यातील धक्कादायक घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवल्यानंतर तिला कानपूरच्या कल्याणपूरमध्ये येण्यासाठी दबाव टाकला. तसेच दिलेल्या ठिकाणी न आल्यास फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीला घाबरून मुलगी शाळेत न जाता थेट कल्याणपूरला पोहोचली. यावेळी आरोपी मित्राने तिला एका मित्राच्या कारमध्ये जबरदस्ती बसवले.
हे वाचलं का?
मुलीचा आरोप आहे की, दोन्ही आरोपींनी तिला कल्याणपूरच्या सरीता पॅलेस गेस्ट हाऊसमध्ये नेले होते. दोघांनी या गेस्ट हाऊसच्या खोलीत नेऊन माझ्यावर गॅंगरेप केला.यानंतर दोघांनी माझ्यावर मुस्लिम धर्म स्विकारण्यासाठी दबाव टाकला होता. या दरम्यान संधी मिळताच मुलीने घटनास्थळावर आरडाओरड करायला सुरुवात केली आणि घटनाक्रम उघडकीस आला. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती.
एसीपी विकास पांडे या प्रकरणावर म्हणाला की, मुलीच्या तक्रारीनंतर आरोपींवर गॅगरेप आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुलीचे मेडिकल चाचणी केल्यानंतर कलम 164 नुसार जबाब नोंदवण्यात येणार आहे. तसेच चौकशीनंतर या प्रकरणात धर्म परीवर्तनाचा दबाव टाकल्याचे कलम जोडले जाणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता लकी खान आणि साहेब खान या दोन तरूणावर गुन्हा दाखल केला आहे.तसेच आरोपींनी अशा किती मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवले आहेत की नाही, याचा पोलीस तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Crime: तब्बल 8 महिने सुरू होती महिलेच्या अंर्तवस्त्राची चोरी, चोर निघाला….
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT