इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर अनामिकावर पतीनेच झाडल्या गोळ्या, व्हिडीओ व्हायरल
इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर अनामिका बिश्नोईवर तिच्या पतीनेच गोळी झाडून हत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या हत्येचा व्हिडीओ व्हायरल झाला असून आता पती फरार झाला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर अनामिकाची गोळी झाडून हत्या
इन्फ्ल्युएन्सर अनामिकावर पतीनेच झाडल्या गोळ्या
Rajasthan Falodi Crime: एकेकाळी इन्स्टाग्रामच्या प्रत्येक दुसऱ्या रीलमध्ये दिसणारी अनामिका बिश्नोई (Anamika Bishnoi) नेहमी आपल्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना आनंदी आणि मोकळेपणानं जीवन जगण्याचा सल्ला द्यायची. तिच अनामिका जी आपल्या सुंदर हास्यामुळे साऱ्यांनाच एक आनंदी राहण्याचा सल्ला देणारी आणि राजस्थानी (Rajasthani) पोशात दिसणारी अनामिकाने मात्र आता जगाचा निरोप घेतला आहे.
ADVERTISEMENT
ती ज्या प्रमाणं अगदी छोट्या छोट्या गोष्टी सोशल मीडियावर टाकून सगळ्या गोष्टींची माहिती ती आपल्या फॉलोअर्संना द्यायची. त्याच सोशल मीडियावरून आता तिच्या हत्येचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत व्हायरल झाले आहेत. अनामिकाला अगदी जवळून गोळ्या घालण्यात आल्या आहेत, ती घटनाही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
इन्स्टाग्रामवर अनामिक बिश्नोईला एक लाखाच्यावर फॉलोअर्स होते. सोशल मीडियावरून तिला गोळ्या घातल्याचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये ती निवांत बसली असून ती मोबाईलमध्ये काही तरी करताना दिसत आहे. तर तिच्यासमोर असलेल्या टेबलवर लॅपटॉप आणि चहाचा कप आहे.
हे वाचलं का?
त्याचवेळी तिच्या समोर कोणीतरी आलेलं दिसत आहे. समोर असलेल्या माणसाबरोबर ती बोलत असतानाही दिसत आहे. तर तिच्या समोर असलेला व्यक्तीही तिच्यासोबत काही तरी बोलताना दिसत आहे. हे सर्व चालू असतानाच अनामिकाचं सगळं लक्ष मात्र तिच्या मोबाईलमध्ये असलेले दिसते. त्यानंतर अचानक एक व्यक्ती हातात पिस्तुल घेऊन काही क्षणात अनामिकावर गोळ्या झाडताना दिसून येत आहे.
गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर अनामिका आपला चेहरा वळवताना दिसून येते. त्यावेळी तिने कानावरही हात ठेवले आहेत. तर समोरील व्यक्ती मात्र एकामागोमाग एक असा तीन वेळा गोळीबार करतो, नंतर काही काळ थांबून पुन्हा एक गोळी झाडतो. त्यानंतर ती खुर्चीवरच निपश्चिंत पडल्याचे दिसून येते.
ADVERTISEMENT
ही घटना काही सेकंदातच सोशल मीडियावर व्हायरल झाली. मात्र व्हिडीओमध्ये समोरून गोळ्या घातलेली महिला ही आणखी कोणी नसून अनामिका बिश्नोई असल्याचं स्पष्ट झाले, तर अनामिकाला गोळी घालणारा दुसरा तिसरा कोणीही नसून तिच्या नवऱ्यानेच तिला गोळ्या घातल्याचेही उघड झाले. त्यानंतर अनामिका बिश्नोईची हत्या झाल्याची घटना वाऱ्यासारखी पसरली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Paytm च्या ऑफिसरने आत्महत्या केल्यानंतर पत्नीनेही उचललं टोकाचं पाऊल, भावाने केला मोठा खुलासा
अनामिका विश्नोईला अन्नी बिश्नोई नावानं ओळखलं जात होते. अन्नी विश्नोईचे इन्स्टाग्रामवर 1 लाख 60 हजार फॉलोअर्स होते. अन्नी विश्नोईची इन्स्टाग्रामवर एक वेगळी ओळख होती. मात्र आता तिच्यावर गोळी झाडणारा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा नवरा महिराम विश्नोई होता हे त्याने आता उघड केले आहे.मात्र तो सध्या फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राजस्थानमधील फलोदी येथे ही घटना 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी अनामिका तिच्या दुकानात बसली होती. अनामिका फलोदीमध्ये महिलांच्या कपड्यांचे दुकान चालवत होती. अनामिकाबाबत तिचे वडील तेजा राम सांगतात की, अनामिका आणि तिच्या पतीमध्ये गेल्या दीड वर्षांपासून वाद सुरू होते. दोघांमध्ये सतत भांडण होत असल्याने अनामिका माहेरी येऊन राहत होती. दयासागर खारामध्ये ती दुकान चालवत होती, आणि त्यामधूनच ती स्वतःचा आणि मुलांचा खर्च चालवत होती.
अनामिका आणि तिचा पती महिराम बिश्नोई यांच्यामध्ये दोन गोष्टींवरून भांडण झाले होते. एक तर महिराम हा हुंड्यासाठी सातत्याने तिला त्रास देत होता, त्यामुळे तिच्याविरोधात तिने पोलिसात तक्रारही दाखल केली होती. हा वाद चालू असतानाच तिने सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणे हे ही त्याला पसंद नव्हते, त्यामुळेही तिच्यावर तो चिडून होता.
या दोन्ही गोष्टीवरून वाद सुरु झाल्यानंतर अनामिकाने माहेरी येऊन दुकान चालवून आपल्या स्वतःचा आणि दोन मुलांचा खर्च चालवण्यास समर्थ असल्याचे त्याला सांगितले.
अनामिकाने तासाभरापूर्वीच इन्स्टाग्रामवर तिने स्टोरी पोस्ट केली होती. नंतर 12 सेकंदात पतीने तिच्यावर गोळ्या झाडून इन्फ्लुएन्सर अनामिकाची हत्या केली. तिला गोळ्या घालतानाचा व्हिडीओ आता प्रचंड व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा >> जयाप्रदा फरार! न्यायालयानं काढलं अटक वॉरंट, नेमकं प्रकरण काय?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT