Gold Smuggling in Private Part : प्रायव्हेट पार्टमधून तस्करी, एक्स-रेमधून समोेर आला भलताच प्रकार, सोन्याचे तब्बल...
जयपूर विमानतळावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एक व्यक्ति थेट आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून सोन्याची तस्करी करताना पकडला गेलाय.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
तस्करीचं टोक, किलोभर सोनं जप्त
प्रायव्हेट पार्टमधून ऑपरेशन करुन काढलं सोनं
सोन्याची तस्करी करणाऱ्या एअर पोर्टवर कारवाई
वेगवेगळ्या गोष्टींची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या अनेक करामती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईतून उघड होत असतात. त्यातच आता जयपूर विमानतळावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एक व्यक्ति थेट आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून सोन्याची तस्करी करताना पकडला गेलाय. तुम्ही म्हणाल की यात नवीन काय? तर यात नवीन हे आहे की या तस्कराने थोडं थोडकं नाही, तर तब्बल एक किलो सोनं आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपवल्याचं समोर आलं आहे. (Jaipur airport Custom officers seized gold of 1 kg from private part of smuggler)
ADVERTISEMENT
जयपूर एअर पोर्टवर केलेल्या या कारवाईची सध्या देशभरात चर्चा होतेय. कस्टम अधिकाऱ्यांना या गोष्टीबद्दल टीप मिळाली होती. त्यानंतर अधिकारी सतर्क होते. जेव्हा हा व्यक्ति एअर पोर्टवर आला तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याला अडवून चेक केलं. त्याचा एक्स-रे करण्यात आला. त्याच्या एक्स-रे रिपोर्टमधून असं समोर आलं की, त्याने शरिरात एक कॅप्सूल लपवलं. या कॅप्सूलमध्ये सोनं होतं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>NCP Rap Song Video : सत्तेच्या लालसेने गद्दारीचा पदर धरला... शदर पवार यांच्या राष्ट्रवादीच्या रॅप साँगचा धुमाकूळ
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार राजस्थानध्ये राहणारी व्यक्त असून, अबू धाबीमधून एतिहाद एअरवेजने प्रवास करून ही व्यक्ति भारतात पोहोचली. महेंद्र खान नावाच्या या व्यक्तिकडून तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Gold Rate Today: बाईईई...दिवाळीआधीच 'दिवाळं' निघणार! मुंबईसह 'या' शहरांमध्ये 24 तासातच गडगडले सोन्याचे दर
कस्टर अधिकाऱ्यांनी महेंद्र खानला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली, तेव्हा आरोपीने डॉक्टरच्या मदतीने सोनं आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं असल्याचं लक्षात आलं. चौकशीनतंर महेंद्र खानला जयपुरिया रुग्णालयात घेऊन जाऊन डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन करुन शरिरातून सोन्याचे तीन तुकडे काढले. यातून लाखो रुपयांचं सोनं बाहेर निघालं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT