Electoral Edge Exit Poll: महायुती सरकारला धक्का! 'इतक्या' जागांवर MVA मारणार बाजी 

मुंबई तक

ADVERTISEMENT

Electoral Edge Exit Poll 2024
Electoral Edge Exit Poll 2024
social share
google news

बातम्या हायलाइट

point

इलेक्टोरल एजचा एक्झिट पोल वाचून तुम्हालाही धक्काच बसेल

point

महायुती किती जागांवर विजय मिळवणार?

point

महाविकास आघाडीला किती जागा मिळणार?

Maharashtra Election 2024 Electoral Edge Exit Poll :राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून आज 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडलीय. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी पहिल्यांदाच आमनेसामने आली आहे. जनतेनं कोणत्या आघाडीला कौल दिला आहे, हे 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यावर स्पष्टच होणार आहे. तत्पूर्वी इलेक्टोरल एजने एक्झिट पोलच्या माध्यमातून या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज वर्तवला आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), शिवेसना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागांवर विजय मिळवता येणार आहे, याची आकडेवारी या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलीय. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Maharashtra Exit Poll Results 2024 LIVE Updates: मतदान संपलं, महाराष्ट्रात 'यांची' येणार सत्ता?

इलेक्टोरल एजच्या एक्झिट पोलनुसार, राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाला 44, काँग्रेसला 60, एनसीपी (शरद पवार) गटाला 46 जागांवर विजय मिळणार आहे. म्हणजेच मविआला 288 जागांपैकी 150 जागांवर बाजी मारता येणार आहे. तर महायुतीत भाजपला 78, शिवसेना शिंदे गटाला 26, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 14 जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात महायुती सरकारला धक्का मिळणार असून महाविकास आघाडी बाजी मारणार असल्याचं या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे. 

 

  • भाजप - 78
  • काँग्रेस - 60
  • एनसीपी (एसपी) - 46
  • शिवसेना, ठाकरे गट - 44
  • शिवसेना, शिंदे गट - 26
  • एनसीपी (अजित पवार) - 14
  • इतर - 20 
    ------------------------------
  • महाविकास आघाडी - 150
  • महायुती - 118
  • इतर - 20

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT