Mumbai Airport Threat call : मुंबई विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी, फोन करणारा म्हणाला माझं...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई विमानतळ उडवण्याची धमकी

point

CISF च्या कन्ट्रोल रुमला धमकी

point

धमकी देणाऱ्यानं फोनवर काय म्हटलं?

Mumbai Airport Threat Call : गेल्या अनेक दिवपासांपासून देशात वारंवार एअरलाईन्सला धमक्यांचे फोन, मेसेज येत आहेत. कित्येक महिने उलटल्यानंतरही हे सत्र तसंच सुरू आहे. नुकताच मुंबई विमानतळालाही एक धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला बुधवारी दुपारी बॉम्बने उडवण्याची धमकी आली आहे.

ADVERTISEMENT

मुंबई विमानतळाला धमकीचा फोन आला. या धमकीच्या फोनमध्ये एका अज्ञात व्यक्तिकडून आलेल्या फोनवरुन विमानतळ उडवण्याचा कट असल्याची धमकी दिली गेली. हा कॉल सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF)च्या कंट्रोल रूमला हा फोन करण्यात आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तिने आपलं नाव मोहम्मद असल्याचं सांगितलं होतं. मुंबईहून अझरबैजानला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये स्फोटके घेऊन जात असल्याचा दावा या व्यक्तिने केला होता.


हे ही वाचा >>Kalamnuri Vidhan Sabha : ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंना धक्का, पैसे वाटल्याच्या आरोपात आमदारावर गुन्हा दाखल

 

मुंबई विमानतळावर सीआयएसएफच्या कंन्ट्रोल रुमला आलेल्या धमकीनंतर यंत्रणा आता अलर्ट झाल्या आहेत. धमकीच्या फोननंतर सीआयएसएफने तात्काळ पोलिसांना संपर्क केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं सतर्क होत विमानतळ परिसरातील सर्व सुरक्षा यंत्रणेला अलर्ट केलं. प्रवाशांच्या सुरक्षेचा विषय लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवत करडी नजर ठेवली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Priya Sarvankar Vs Amit Thackeray : नेता म्हटलं तर कर्तृत्व, वकृत्व, नेतृत्व हवं, नवा चेहरा द्यायला हा सिनेमा आहे का?

 

गेल्या अनेक दिवसांमध्ये एअरलाइन्सला आलेल्या धमक्यांच्या फोनमध्ये वाढ होत असल्यानं राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) देशभरात सुरक्षेचा आढावा घेत सतर्कतेच्या दृष्टीनं महत्वाचे निर्णय घेतले आहे.ऑक्टोबरमध्ये देशभरात वेगवेगळ्या एअरलाईन्सला तब्बल 450 हून अधिक धमक्यांचे कॉल आले. मात्र धमक्यांचे हे फोन खोटे होते. मात्र यामुळे देशात आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं चिंता व्यक्त केली जाते आहे. सुरक्षा यंत्रणांसमोर वाढत जाणाऱ्या या आव्हानांना तोंड देण्यासाठी, NIA च्या सायबर शाखेने या धमकीच्या फोनची चौकशी सुरू केली आहे. धमक्यांच्या या फोन मागचा हेतू आणि त्यामागे नक्की कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न या तपासातून केला जातोय.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT