धीरेंद्र आचार्याच्या शिष्याचा प्रताप! कथेचं आयोजन करणाऱ्याच्या पत्नीलाच पळवलं
कथावाचनासाठी आलेल्या धीरेंद्र आचार्याच्या शिष्याने यजमानाच्या पत्नीलाच पळवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी यजमानाने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ADVERTISEMENT
katha vachak ran away with host wife : मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) छतरपूरमध्ये एका इसमाला रामकथेचे (Ramkatha) आयोजन करणे चांगलेच महागात पडले आहे. कारण कथावाचनासाठी आलेल्या धीरेंद्र आचार्याच्या शिष्याने (Dhirendra Acharya) यजमानाच्या पत्नीलाच पळवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी यजमानाने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे. (katha vachak dhirendra acharya student ran away with host wife shocking story from chhatarpur madhya pradesh)
ADVERTISEMENT
प्रकरण काय?
मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) छतरपूरमध्ये धीरेंद्र आचार्याच्या (Dhirendra Acharya) शिष्याने यजमानाच्या पत्नीलाच पळवल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना 2021 सालची आहे. त्याचं झालं अस की महिलेचे पती किंवा यजमान राहुल तिवारी यांनी गौरीशंकर मंदिरात रामकथेचे आयोजन केले होते. या रामकथेसाठी चित्रकूटच्या धीरेंद्र आचार्य यांना बोलावण्यात आले होते. यावेळी धीरेंद्र आचार्य रामकथेसाठी त्यांचा शिष्य नरोत्तम दास दुबे यांना घेऊन आले होते.
हे ही वाचा : बागेश्वर बाबाला कार्यक्रमापूर्वीच पोलिसांचा इशारा; नोटीसमध्ये काय?
या रामकथे दरम्यान धीरेंद्र आचार्य (Dhirendra Acharya) यांचा शिष्य नरोत्तम दास दुबे याने पत्नीला प्रेमाच्या जाळ्यात फासले होते. या रामकथे (Ramkatha) दरम्यान त्याने तिचा नंबर देखील घेतला. यानंतर दोघांमध्ये मोबाईलवर संभाषणे व्हायला लागली होती. त्यानंतर 5 एप्रिल रोजी नरोत्तम दुबे याने पत्नीला पळवून नेल्याचा गंभीर आरोप राहुल तिवारी यांनी केला होता. यानंतर कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
पत्नीचा मोठा गोप्यस्फोट
या घटनेच्या महिन्याभरानंतर राहूल तिवारी यांची बायको सापडली होती. त्यामुळे राहूल तिवारी आनंदात होते. मात्र पोलिस जबाबात बायकोने जी माहिती दिली, ती ऐकूण राहूल तिवारी यांच्या पायाखालची जमीनच सरकली.कोतवाली पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवण्यासाठी तिला पोलीस स्टेशनमध्ये बोलावले होते. यावेळी महिलेने पतीसोबत राहण्यासोबत नकार दिला होता आणि नरोत्तम दुबेसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. हे ऐकूण पतीला मोठा धक्का बसला होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चोरांचा सुळसुळाट, लाखोंचे दागिने लंपास
या घटनेवर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक (police) अमित सांघवी म्हणाले की, विवादामुळे महिलेला तिच्या नवऱ्यासोबत राहायचे नव्हते. त्यामुळे या प्रकरणात कोणतीच तक्रार दाखल करता येत नाही. तरीही पोलिस या प्रकणाचा तपास करत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT