Video : दुचाकीवरून आले, आईसमोरच मुलावर तलवारीने सपासप वार..., कोल्हापुरात काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

kolhapur crime story three accuse attack with sword incident caught in cctv shocking crime story
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमधील शाहूनगर परिसरात ही घटना घडली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूरातून एक धक्कादायक घटना समोर आली

point

आईसमोरच तिच्या मुलावर तलवारीने हल्ला

point

आईने दगडाने हल्ला परतावून लावला

Kolhapur Crime News : दिपक सुर्यवंशी, कोल्हापूर :  कोल्हापूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत आईसमोरच तिच्या मुलावर तलवारीने (Sword Attack) जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे.विशेष म्हणजे मुलावर झालेला हल्ला पाहता आईने केवळ दगडाच्या मदतीने मुलावरील (Boy Attack) हा हल्ला परतावून लावला होता. त्यामुळे आता आईने दाखवलेल्या या बहादुरीची आता कोल्हापूरात चर्चा रंगली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (cctv) कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. (kolhapur crime story three accuse attack with sword incident caught in cctv shocking crime story) 

ADVERTISEMENT

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमधील शाहूनगर परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेतील पिडीत तरूण सूनील लमानी हा त्याच्या आई वडिलांसह नंदीनी परिसरात राहतो. रविवारी सूनील लमानी आई वडिलांसह शाहूनगर भागात गेले होते. या दरम्यान वडिलांना लघूशंका आल्या कारणाने ते लघूशंकेसाठी गेले होते. 

हे ही वाचा : "मी जर राजकारण आलो, तर..."; उपमुख्यमंत्री फडणवीसांना मनोज जरांगेंचा इशारा, नेमकं काय म्हणाले?

त्यामुळे व्हिडिओत तुम्ही पाहू शकता मायलेक दोघे रस्त्याच्या कडेला बोलत होते. आई रस्त्यावर उभी आहे आणि सुनील दुचाकीवर बसला आहे. या दरम्यानच अचानक तीन तरूण एका दुचाकीवरून येतात आणि आपली दुचाकी काही अंतरावर उभी करतात. गाडी उभी केल्यानंतर त्यांच्यातला एक तरूण सुनीलवर तलवारीने हल्ला करतो. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आपल्या लेकावर झालेला हल्ला पाहता आई जवळ पाडलेला दगड उचलून हल्लेखोराच्या अंगावर धावून जाते. त्यामुळे हल्लेखोर दुसरा हल्ला करण्यापूर्वी  आईचे रौद्ररूप पाहून पळ काढतात. यावेळी आईने हल्लेखोरांवर केलेला हल्ला पाहता सुनीलमध्ये देखील बळ येते आणि तो आईसोबत हल्लेखोरांवर दगडाने हल्ला करायचा प्रयत्न करतो. मात्र तीनही आरोपी दुचाकीवर पळ काढण्यात यशस्वी ठरतात. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : खात्यात 3000 जमाच झाले नाही, महिलांनो कुठे कराल तक्रार?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज आहे. या हल्ल्यात सूनील हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी विनोद कासू पवार, अरविंद कासू पवार आणि विनोद बाबू जाधव यांच्याविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करतात. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहे. या घटनेने कोल्हापूरमध्ये दहशतीचे वातावरण आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT