प्रेमविवाहाची खुन्नस... मुलीच्या कुटुंबीयांनीच घेतला तिच्या नवऱ्याचा जीव, भर रस्त्यात केली हत्या!
जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या कुटुंबीयांकडून तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जळगावमध्ये प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरूणाची हत्या

मुलीच्या कुटुंबीयांनी केली तिच्या नवऱ्याची निर्घृण हत्या

सात ते आठ जणांनी कोयता, तलवारीने केला तरुणावर हल्ला
मनीष जोग, जळगाव: जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात रविवारी सकाळी एका तरुणाची सात ते आठ जणांनी कोयता, तलवार अशा धारदार शस्त्रांनी वार करत निर्घृणपणे हत्या केली. या घटनेत सहा ते सात जण देखील जखमी झाले आहेत. (love marriage ends in disaster girls family takes revenge and murders her husband on the road shocking incident in jalgaon)
नेमकी घटना काय?
मुकेश शिरसाळे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. जळगावातील पिंप्राळा हुडको भागात तो त्याच्या कुटुंबासोबत राहत होता. 3 ते 4 वर्षांपूर्वी त्याने गल्लीतच राहणाऱ्या मुलीशी पळून जाऊन लव्ह मॅरेज केलं होतं. दोघंही एकाच समाजाचे असताना देखील या गोष्टीचा राग मुलीच्या कुटुंबीयांच्या मनात होता. त्यातूनच दोन्ही कुटुंबांमध्ये अधूनमधून खटके उडत होते.
हे ही वाचा>> Satara Crime News : शेतात आढळला धड नसलेला मृतदेह, साताऱ्यात खळबळ, काळ्या जादूचं प्रकरण?
शनिवारी रात्री देखील त्यांच्यात वाद झाले होते. त्यानंतर रविवारी सकाळी मुकेश दुकानावर जात असताना मुलीच्या नातेवाईकांनी मारहाण करत त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेवेळी मुकेशला वाचवायला आलेले त्याचे आई, वडील, पत्नी आणि भावांनाही मारहाण झाली.

रात्री ज्यावेळी वाद झाला तेव्हा शिरसाळे कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. पण पोलिसांनी दखल घेतली नाही, पोलिसांनी दखल घेतली असती तर ही घटना घडली नसती, असा आरोप शिरसाळे कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
हे ही वाचा>> Badlapur Thane Crime News : पत्नीवर अतिप्रसंग करणाऱ्या मित्राला पतीने डोक्यात हातोडी घालून संपवलं, नंतर...
या घटनेनंतर जळगावच्या रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सात संशयित आरोपींना ताब्यात देखील घेतलं आहे.
दरम्यान, कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या झाल्याने जळगाव शहर हादरलं आहे. सध्या पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.