ललित पाटील ड्रग्ज प्रकरण! अवघ्या पोलिसांना गुंगारा देणारे आरोपी पाटील बंधू कोण?
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात 300 कोटी रुपयांचे 150 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. त्याचे मुख्य आरोपी लखनऊ जिल्ह्यात आहेत आणि ते नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात आहेत. याशिवाय त्यांच्यासोबत कट रचून महाराष्ट्रातील सर्वात मोठा ड्रग माफिया ललित पाटीललाही त्यांनी पोलिसांच्या ताब्यात पळून जाण्यास मदत केली होती.
ADVERTISEMENT
Drugs Crime Pune : उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथून फरार असलेले दोन ड्रग्स तस्करांच्या (drug smuggling) पोलिसांनी आज मुसक्या आवळल्या. त्याला आणि त्याच्या लहान भावाला पोलिसांनी अटक करुन त्या दोघांवर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) पथकाने 4 ऑगस्ट रोजी नाशिकजवळ 300 कोटी रुपयांचे 150 किलो एमडी ड्रग्जप्रकरणी (MD Drugs) मोठी कारवाई केली होती. अभिषेक विलास बलकवडे व भूषण अनिल पाटील या दोघा तस्करांच्या पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
ADVERTISEMENT
नेपाळ बॉर्डरवर अटक
ड्रग्स प्रकरणी फरार असलेले दोघं भावांना नेपाळला पळून जाताना त्यांना अटक केली आहे. लखनऊच्या एसटीएफ आणि महाराष्ट्र पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी संध्याकाळी बहराइचमार्गे नेपाळला पळून जात असताना या दोन आंतरराष्ट्रीय मॉर्फिन तस्करांना नगर कोतवाली भागात अटक केली.यावेळी या आरोपींनी आपली नावे व पत्ते अभिषेक विलास बलकवडे,विजय आणि भूषण अनिल पाटील हे दोघंही नाशिकचे असल्याचे सांगण्यात आले.
हे ही वाचा >> NCP: ‘लबाड, धूर्त आणि गद्दार…’ जयंत पाटील संतापले, अजित पवारांवर एवढी जहरी टीका?
मोठा ड्रग माफिया
पुण्यातील गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात 300 कोटी रुपयांचे 150 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. त्याचे मुख्य आरोपी लखनौ जिल्ह्यात आहेत आणि ते नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात आहेत. याशिवाय त्यांच्यासोबत कट रचून महाराष्ट्रातील सर्वात मोठा ड्रग माफिया ललित पाटील याचीही 2-10-2023 रोजी पोलिसांच्या ताब्यातून सुटका करण्यात आली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ड्रग्सची मोठी साखळी
तसेच भूषण अनिल पाटील हा ड्रग माफिया ललित पाटीलचा धाकटा भाऊ असून अभिषेक हा बलकवडे ललित पाटील यांच्या ड्रग्ज नेटवर्कचा मुख्य असल्याचेही सांगितले. या दोघांनी सांगितले की, ललित पाटील सोबत ते 2014 पासून पब, बार आणि रेव्ह पार्ट्यांमध्ये वापरण्यासाठी ड्रग्स बनवत होते. या कामासाठी या लोकांनी आधी औरंगाबाद आणि नंतर पुणे, नाशिक येथे कारखाने काढले. २०२० मध्ये ललित पाटीलला अटक केल्यानंतर ललितच्या सूचनेवरून त्याचा भाऊ भूषण अनिल पाटील आणि अभिषेक बलकवडे यांनी संपूर्ण टोळीची सूत्रे हाती घेतली.
एमडी ड्रग
मुंबईत 4 ऑगस्ट रोजी 150 किलो एमडी ड्रग जप्त करताना ललित पाटील आणि त्याच्या टोळीतील इतर सदस्यांची नावं समोर आली होती. त्यावेळी भूषण अनिल पाटील, अभिषेक बलकवडे यांनी कट रचून ललित पाटीलला पोलिसांच्या ताब्यातून पसार केले होते. एमडी ड्रग बनवण्याचा कच्चा माल नाशिक जिल्ह्यातील शिवाजी शिंदे यांनी दिल्याचेही त्यावेळी त्यांनी सांगितले होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> एकाच खोलीत 6 मुली, एक मुलगा, ‘तो’ प्रकार बघून पोलिसही गांगरले!
नेपाळला जाण्याचा विचार
शिवाजी शिंदे हा एक किलो एमडी ड्रग्ज ललितच्या फिक्स्ड खरेदीदारांना दीड कोटी रुपये प्रति किलो या दराने विकत होता. तर मिळवलेले पैसे मुंबईतील अभिजीत नावाच्या सोनाराकडून सोन्यात रुपांतरीत करत होता. त्याने 10 महिन्यांत 8 किलो सोने खरेदी करून महाराष्ट्रात विविध ठिकाणी लपवून ठेवले असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. ललितच्या सांगण्यावरुन तो नेपाळला पळून जाण्याचा विचार करत होता असंही पोलिसांनी यावेळी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT