Manipur: जमावाकडून महिलांची नग्न धिंड, गँगरेप आणि खून… मणिपूरमध्ये काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

manipur horrific viral video gang rape 2 women naked pared pm narendra modi
manipur horrific viral video gang rape 2 women naked pared pm narendra modi
social share
google news

Manipur 2 Women Gangraped Case: मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 4 मे 2023 रोजी मणिपूरच्या थौबाल जिल्ह्यात ही घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. विशेष म्हणजे या घटनेला घडून तब्बल दोन महिने उलटून देखील अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नव्हती. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य़ सरकारला फटकारले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला होता. दरम्यान हे नेमके प्रकरण काय आहे? आणि घटना काय घडली आहे? हे जाणून घेऊयात. (manipur horrific viral video gang rape 2 women naked pared pm narendra modi)

ADVERTISEMENT

व्हायरल व्हिडिओत काय?

मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न करून त्यांची धिंड काढली होती. इतकेच नाही तर या दोन महिलांना शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. 4 मे 2023 रोजी मणिपूरच्या थौबाल जिल्ह्यात ही घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओत महिलांसोबत झालेल्या अत्याचार आणि हिंसेने संपूर्ण देश हादरला आहे.

हे ही वाचा : लव, सेक्स आणि धर्मांतर! मीरा रोडमधील 22 वर्षीय तरूणीसोबत काय घडलं?

खरं तर या घटनेत हजारोंच्या जमावाने गावावर हल्ला केला होता. या जमावाने महिलांना कपडे उतरवण्यास भाग पाडले होते. जो व्यक्ती जमावाच्या या कृत्याला विरोध करायचा त्याची हत्या केली जायची. या जमावाच्या हाती यावेळी 21 वर्षाची एक तरूणी, 42 आणि 52 वर्षांची एक महिला लागली होती. या महिलांना कपडे उतरवण्यास भाग पाडतं त्यांची नग्न धिंड काढण्यात आली होती. यामधील काही महिलांना शेतात नेऊन त्यांच्यासोबत सामूहिक बलात्कारही करण्यात आला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे वाचलं का?

या घटनेप्रकरणी 18 मे ला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या तीन दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र गुन्हा दाखल करून सुद्धा तब्बल दोन महिने आरोपींना अटक झाली नव्हती. बुधवारी तरूणींचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. नोंगपोक सेकमाई पोलीस ठाण्यात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी आज गुरूवारी या घटनेतील मुख्य आरोपी खुयरूम हेरादसला अटक केली आहे.

एफआयआरमध्ये धक्कादायक खुलासे

एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनूसार, पीडीत महिलांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले की, 4 मे च्या दुपारी अज्ञात जमाव साधारण 900 ते 1000 नागरीकांनी थौबाल जिल्ह्यात हल्ला केला होता. हे हल्लेखोर मतैई समाजाचे होते. या जमावाने गावावर हल्ला करून आग लावली आणि त्यानंतर नागरीकांच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने लुटले होते. जमावाच्या हल्ल्यानंतर तीन महिला आणि त्यांचे वडिल आणि भाऊ जंगलाच्या दिशेने धावत होते. यावेळी पोलिसांच्या टीमने या सर्वांना वाचवले. मात्र पोलीस या कुटुंबियांना घेऊन जात असताना जमावाने त्यांच्याकडून कुटुंबियांना हिसकावले. यावेळी जमावाने पोलिसांसमोरच वडिलांची हत्या केली. यानंतर तीनही महिलांना कपडे उतरवण्यास भाग पाडतं त्यांची नग्न धिंड काढण्यात आली होती. यामधील 21 वर्षीय तरूणीवर शेतात सामूहिक बलात्कारही करण्यात आला होता. या घटनेला भावाने विरोध करताच त्याची देखील हत्या करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

माझं मन दु:ख आणि रागाने भरलं आहे. मणिपूरची जी घटना समोर आली ती कोणत्याही सभ्य समाजासाठी लज्जास्पद घटना आहे.हे पाप करणारे, गुन्हा करणारे किती आहेत, कोण आहेत हे बाजुला ठेवा.मात्र या घटनेने संपूर्ण देशाला मान खाली घालायला लावली आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर घटनेववर दिली आहे. मी सर्व मुख्यमंत्र्यांना आग्रह करतो की, त्यांनी आपल्या राज्यातील कायदा सुव्यवस्था मजबूत करावी. आपल्या राज्यातील महिला भगिनींसाठी कठारोत कठोर पाऊले उचलावीत. ही घटना राजस्थानची, छत्तीसगडची किंवा मणिपूरची असो, राजकीय वादापलिकडे जाऊन कायदा सुव्यवस्था आणि महिलांचा सन्मान राखला गेला पाहिजे, कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही, कठोर पालवे उचलली जातील, असा इशारा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT