मीरा रोड : मुलीचं प्रकरण… विद्यार्थ्याने शिक्षकावर रस्त्यावरच केले सपासप वार

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

minor student attacked own tuition teacher with a knife kashimeera Mira Road crime story
minor student attacked own tuition teacher with a knife kashimeera Mira Road crime story
social share
google news

मीरा रोडच्या (Mira Road) काशीमीरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका अल्पवयीन विद्यार्थ्यांने आपल्याच ट्यूशन टिचरवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात ट्यूशन टिचर राज ठाकूर (26) हे जखमी झाले आहेत. या घटनेनंतर स्थानिकांनी राज ठाकूर यांना नजीकच्या रूग्णालयात दाखल केले होते.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. ट्युशन टिचरने आरोपी विद्यार्थ्याला शिकवणीसाठी येणाऱ्या मुलींशी बोलण्यास रोखले होते, तसेच स्वत:च्या अभ्यासावर लक्ष देण्याचा सल्ला दिला होता. यामुळेच संतापून आरोपी विद्यार्थ्यांने ट्यूशन टिचरवर हल्ला केला होता. या घटनेने सध्या  मिरा रोड हादरलंय. (minor student attacked own tuition teacher with a knife kashimeera Mira Road crime story)

ADVERTISEMENT

राज ठाकूर हे ठाकूर कोचिंग क्लासेसचे मालक आहेत, आणि ते स्वत:’च हे कोचिंग क्लासेस चालवतात. त्या दिवशी ते रस्त्यावर विद्यार्थ्यांच्या पालकांशी बोलत होते. या दरम्यान एक तरूण त्यांच्या मागून आला आणि त्याने चाकुने हल्ला करायला सुरुवात केली. या हल्यानंतर ठाकूर यांनी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी हत्येच्या इराद्यानेच आला होता.आरोपीने ठाकूर यांच्यावर चाकूने वार सुरुच ठेवले होते. या हल्ल्यानंतर राज ठाकूर जमिनीवर कोसळले होते. यानंतर आरोपीने चाकू घटनास्थळी फेकत पळ काढला होता. ही संपूर्ण घटना नजीकच्या सीसीटीव्ही कैद झाली होती. यानंतर स्थानिकांनी राज ठाकूर यांनी नजीकच्या रूग्णालयात दाखल केले होते. सध्य़ा त्यांची प्रकृती स्थिर आहे.

हे ही वाचा : सना खान हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! पतीबरोबर आणखी एकाचा सहभाग, कोण आहे तो?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, राज ठाकूर यांच्यावर चाकू हल्ला हा त्यांच्याच ट्यूशनमध्ये शिकत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने केला होता. या विद्यार्थ्यांला ठाकूर यांनी शिकवणीसाठी येणाऱ्या मुलींशी बोलण्यास रोखले होते, तसेच स्वत:च्या अभ्यासावर लक्ष देण्याचा सल्ला दिला होता. आणि ट्यूशनमधील मुलींना देखील आरोपीशी न बोलण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सर्व प्रकरणाची माहिती मिळताच आरोपी विद्यार्थ्याने संतापून ट्यूशन टीचर ठाकूरवर हल्ला केला होता. या घटनेत सुदैवाने ट्युशन टिचर बचावले आहेत.

हे वाचलं का?

या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी विद्यार्थ्यालाही अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.

हे ही वाचा : Crime: नदीवर कपडे धुवायला उतरले, पोहायचा मोह आवरला नाही अन् घडली भयंकर घटना

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT