NCRB Crime Report : देशात दर तासाला 3 आणि दर 20 मिनिटाला एका महिलेवर अत्याचार, महाराष्ट्रात परिस्थिती कशी?

सुधीर काकडे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दिल्लीतील निर्भया प्रकरणाला 12 वर्ष

point

देशात कोणत्या राज्यात होतात सर्वाधिक अत्याचाच्या घटना?

NCRB Crime Report : राजधानी दिल्लीत 16 डिसेंबर 2012 च्या रात्री चालत्या बसमध्ये एका विद्यार्थिनीवर अत्याचार करत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या होत्या. बसमध्ये सहा जणांनी तिच्यावर अत्याचार करुन नंतर तिला व तिच्या मित्राला अर्धमेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून देऊन तिथून निघून गेले होते. काही दिवसांनी पीडितेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर देशभरातून संताप व्यक्त केला गेला होते. या घटनेला आज बारा वर्ष पूर्ण झालीत. त्यानंतर केले गेलेले कठोर कायदे किती प्रभावी ठरले? देशात महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये किती घट झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न NCRB च्या आकड्यांमधून करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) या केंद्र सरकारच्या एजन्सीच्या आकडेवारीवरून असं दिसून येतं की, भारतात दरवर्षी चार लाखांहून अधिक महिला अत्याचाराशी संबंधीत गुन्हे नोंदवले जातात. या गुन्ह्यांमध्ये फक्त बलात्कारच नाही तर विनयभंग, हुंडाबळी, अपहरण, तस्करी, ॲसिड हल्ला यांसारख्या गुन्ह्यांचाही समावेश आहे.

हे ही वाचा >> Maharashtra Cabinet : शपथविधी घेताच वाढवली मंत्र्यांची धाकधूक? शिंदे-फडणवीसांनी अडीच वर्षाबद्दल केलं सूचक वक्तव्य

कठोर कायदे करुनही या घटनांमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. आकडेवारी सांगते की, 2012 पूर्वी दरवर्षी सरासरी 25 हजार बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद होत होती. मात्र त्यानंतर हा आकडा 30 हजारांच्या वर पोहोचला.  2013 या एकाच वर्षात 33 हजारांहून अधिक गुन्हे दाखल झाले. 2016 मध्ये हा आकडा 39 हजारांच्या जवळ पोहोचला होता.

हे वाचलं का?

महिला अत्याचाराशी संबंधीत गुन्ह्यांची आकडेवारी भयावह आहे. 2012 मध्ये महिलांवरील 2.44 लाख गुन्ह्यांची नोंद झाली होती. तर 2022 मध्ये 4.45 लाखांहून अधिक प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. म्हणजेच दररोज 1200 हून अधिक केसेस दाखल होतात.

हे ही वाचा >> Nilesh Rane Tweet : "राणेंना संपवता संपवता तुमचं...", नितेश राणे मंत्री होताच निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं
 

तसंच बलात्काराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार 2012 मध्ये 24 हजार 923 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले होते. तर दररोज सरासरी 68 केसेस होतात. धक्कादायक म्हणाले 2022 मध्ये 31 हजार 516 प्रकरणं नोंदवण्यात आली होती. त्यानुसार दररोज सरासरी 86 गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणजेच देशात दर तासाला 3 आणि दर 20 मिनिटाला एका महिलेवर अत्याचार होतो.

ADVERTISEMENT

देशातील वेगवेगळ्या राज्यांबद्दल विचार केल्यास, बलात्काराच्या सर्वाधिक घटना राजस्थानमध्ये नोंदल्या गेल्याचं  दिसलं आहे. 2022 मध्ये राजस्थानमध्ये बलात्काराचे 5,399 गुन्हे दाखल झाले. तर 3,690 प्रकरणं उत्तर प्रदेशमध्ये नोंदवली गेली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश असून, मध्यप्रदेशाथ 3,029 प्रकरणं नोंदवले गेले. तर त्यानंतर महाराष्ट्रात 2022 मध्ये 2,904 प्रकरणं नोंदवले गेले आहेत. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT