कुत्र्यामुळे झालेला पाणउतारा… मुंबईची अभिनेत्री थेट शारजाहच्या तुरुंगात : वाचा भयंकर बदल्याची गोष्ट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbai Crime Branch arrested two suspects in the case of actress Krishan Pereira drugs case, she lodged in Sharjah Jail
Mumbai Crime Branch arrested two suspects in the case of actress Krishan Pereira drugs case, she lodged in Sharjah Jail
social share
google news

मुंबई : अभिनेत्री क्रिशन पेरारला (Krishan Pereira) ड्रग्ज प्रकरणात अडकविल्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने 2 संशयितांना अटक केली आहे. क्रिशन परेरा ड्रग्ज प्रकरणात सध्या संयुक्त अरब अमिरातीमधील शारजाह येथील तुरुंगात आहे. रवी बोभाटे आणि अँथनी पॉल असे दोघांचे नाव आहे. हॉलिवूडमध्ये काम देण्याचा शब्द देऊन या दोघांनी क्रिशन परेराला शारजाहाला पाठवलं आणि जाताना एक ट्रॉफी दिली, याच ट्रॉफीमध्ये ड्रग्ज लपविले होते, असा दावा करण्यात येत आहे. (Mumbai Crime Branch arrested two suspects in the case of actress Krishan Pereira drugs case, she lodged in Sharjah Jail)

ADVERTISEMENT

याबाबत गुन्हे शाखेने दिलेली अधिक माहिती अशी की, अँथनी पॉल आणि रवी बोभाटे या दोघांनी मिळून क्रिशन परेराच्या आईचा बदला घेण्यासाठी या दोघांनी हा कट रचला. अँथनी पॉल काही वर्षांपूर्वी लॉकडाऊन दरम्यान क्रिशनच्या इमारतीत गेला होता, त्यावेळी क्रिशन परेराच्या कुटुंबीयांच्या घरात असलेल्या कुत्र्याने अँथनीच्या पॉलचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अँथनीने एका तुटलेल्या खुर्चीच्या मदतीने कुत्र्याला मारत दूर हटकण्याचा प्रयत्न केला. यावर क्रिशनची आई प्रमिला परेरा यांनी अँथनीचा पाणउतारा केला. यामुळे अँथनी दुखावला गेला. यानंतर त्याने रवी बोभाटेच्या सोबत मिळून हा कट रचला.

Crime : “मला तुझ्याशी लग्न करायचं आहे” : मुलाने केलं प्रपोज; नकार देताच भररस्त्यात…

क्रिशन परेराच्या कुटुंबाने गुन्हे शाखेला दिलेल्या तक्रारीनुसार, मार्च 2023 मध्ये प्रेमिला परेरा यांना रवी नामक व्यक्तीकडून रिअल इस्टेट कर्जासाठी फोन आला. त्याने स्वतःची बिझनेसमन म्हणून ओळख करुन दिली. त्याच काळात तो कृष्ण परेराला भेटला होता, त्याने सांगितले की त्याने टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली आहे. रवी नावाच्या या व्यक्तीने क्रिशनला त्याच्या टॅलेंट पूल टीमशी ओळख करून देण्याची ऑफर दिली. मार्चमध्ये ग्रँड हयात हॉटेलमध्ये एका आंतरराष्ट्रीय वेब सीरिजसाठी त्याच्या टीमशी क्रिशनची ओळख करून दिली. यात क्रिशनची निवडही झाल्याचं सांगण्यात आलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यानंतर रवी नावाच्या व्यक्तीने क्रिशनला दुबईला जाऊन ऑडिशन देण्यास सांगितले. परेरा कुटुंबियांचे अनेक नातेवाईक दुबईत राहतात, त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला दुबईला जाण्याची परवानगी दिली. पण रवीने 27 मार्चला शारजाहसाठी तिकीट बुक केले. दुबईऐवजी शारजाहचे तिकीट का काढले, असे विचारले असता दुबईची फ्लाईट महाग आहे, त्यामुळे शारजाहचे तिकीट काढल्याचे त्याने सांगितले. तसंच जेव्हा शारजाहमध्ये ती उतरेल तेव्हा तिला दुबईला घेऊन जाण्यासाठी त्याच्या टीममधील लोक येतील. यामुळे कमी पैशांत दुबईला जाणं होईल.

ADVERTISEMENT

खळबळजनक… पुण्यात प्रेयसीच्या बाळाची उकळत्या पाण्यात बुडवून हत्या, कारण…

क्रिशनच्या पासपोर्टची मुदत १० एप्रिल रोजी संपत होती. त्यामुळे ती 2 दिवसांमध्ये जाऊन, ऑडिशन देऊन माघारी येईल असे ठरवले. त्यानुसार ती शारजाहला जायला निघाली. त्याचवेळी 1 एप्रिलला निघण्यापूर्वी रवी क्रिशन परेराला विमानतळावर भेटला. तेव्हा त्याने क्रिशनला एक ट्रॉफी दिली आणि तिला सांगितले शारजाहामध्ये ऑडिशनसाठी घेऊन जाण्यास सांगितले. यामुळे वेब सीरिजच्या टीमसमोर चांगली छाप पडले, असे सांगितले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, शारजाहला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बसेपर्यंत क्रिशन त्यांच्या संपर्कात होती. इतकचं नाही तर जेव्हा ती शारजाहामध्ये विमानतळावर पोहोचली तेव्हा तिने कुटुंबाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपला लँडिंगबद्दलही माहिती दिली.

ADVERTISEMENT

विमानतळावर उतरल्यानंतर रवीने पाठवलेले मेसेज पाहण्यासाठी क्रिशनने व्हॉट्सअॅप उघडले, तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. रवीने व्हॉट्सअॅपवरील डिसअॅपीअर मेसेज या फिचरचा उपयोग केल्याने पाठविलेले मेसेज गायब झाले होते. त्यानंतर क्रिशनने ज्या हॉटेलला तिच्या बुकिंगबद्दल सांगितले होते त्या हॉटेलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र हॉटेलमध्ये तिच्या नावावर बुकिंग नसल्याचे हॉटेलकडून क्रिशनला सांगण्यात आले. यानंतर आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे क्रिशनच्या लक्षात आले. तिने हा सगळा प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला तेव्हा त्यांनी क्रिशनला तातडीने विमानतळ पोलिसांना घटनेची माहिती देण्यास सांगितले.

क्रिशनच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ती पोलिसांना भेटण्यासाठी तेथे गेली तेव्हा तिच्या फोनची बॅटरी 3% होती. त्यानंतर क्रिशन आणि त्यांचा संपर्क तुटला.यानंतर कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला आणि क्रिशनशी संपर्क न झाल्याबद्दल जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि पोलिसांना सांगितले की तिचे 3 एप्रिल रोजी परतीचे तिकीट आहे. यानंतर, भारतीय दूतावासाच्या ईमेलमधून क्रिशनला अटक केल्याची माहिती कुटुंबाला समजली. 10 एप्रिल रोजी भारतीय वाणिज्य दूतावासाने कुटुंबाला सांगितले की तिच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले असून त्याच आरोपाखाली तिला अटक करण्यात आली. तिच्याकडे असलेल्या ट्रॉफीमध्ये पोलिसांना ड्रग्ज आढळून आले. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात गुन्हे शाखेच्या पथकाने सध्या रवी आणि अँथनी पॉल नावाच्या या दोघांना अटक केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT