मुंबईत खळबळ माजवणारी घटना, तरुणीकडून लग्नाआधीच झाली चूक; नंतर नवजात मुलीचा..
एका महिलेला तिच्या नवजात बाळाला कचरा कुंडीत फेकल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या महिलेचं वय २३ वर्ष असून तिला तिच्या नवजात बाळाला मुंबईतील सरकारी रुग्णालयात कचरा कुंडीत फेकल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
Mumbai Crime New : सध्याच्या काळात प्रत्येक क्षेत्रात मुली प्रगती करताना दिसतात. घर तर सांभाळतातच पण मोठमोठ्या जबाबदाऱ्याही सहज पार पाडतात. पण भारत चंद्रावर पोहोचला असला तरी असे काही लोक आहेत जे विचारांनी अजूनही मागास आहेत. मुलं आणि मुली यांच्यात भेदभाव करतात. स्त्री भ्रूणाची किंवा जन्मानंतर त्यांची हत्या करतात. असाच काहीसा प्रकार मुंबईत घडला आहे. (Mumbai Crime News In Sion Hospital A mother threw her newborn girl Child in the garbage and baby died)
ADVERTISEMENT
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेला तिच्या नवजात बाळाला कचरा कुंडीत फेकल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या महिलेचं वय २३ वर्ष असून तिला तिच्या नवजात बाळाला मुंबईतील सरकारी रुग्णालयात कचरा कुंडीत फेकल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
वाचा : Lalit Patil Drug Case : ठाकरेंच्या आमदाराने फडणवीसांना घेरलं, विधान परिषदेत काय घडलं?
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘शुक्रवारी (8 डिसेंबर) सकाळी एका स्वच्छता कर्मचाऱ्याला ही नवजात मुलगी महापालिकेच्या सायन रूग्णालच्या टॉयलेटमधील डस्टबिनमध्ये आढळली. यानंतर तातडीने तिची तपासणी करण्यात आली मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.’
हे वाचलं का?
पोटच्या लेकीला जीवे मारण्याचं कारण काय?
अधिकाऱ्याने सांगितले की, ‘लग्न न करता आई झाल्यानंतर बदनामी टाळण्यासाठी महिलेने हे पाऊल उचललं. जवळच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला शौचालयाजवळ संशयास्पदरित्या फिरतानाही दिसत आहे. ही महिला धारावी येथे राहते. तिला तिच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली आहे आणि चौकशीत तिने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.
वाचा : Sharad Pawar : “प्रिय बाबा…”, पवारांच्या वाढदिवशी सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
आरोपी महिलेवर गुन्हा दाखल
आरोपी महिलेवर भारतीय दंड संहिता कलम 315 (मूल जिवंत होऊ नये किंवा जन्मानंतर त्याचा मृत्यू होण्याच्या हेतूने केलेली कृती) आणि कलम 317 (12 वर्षांखालील मुलाला आई-वडील किंवा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीने उघड्यावर टाकणे आणि त्याचा परित्याग करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT