Mumbai Crime : अवजड बॅग, रक्ताचे डाग अन्...; दादर स्थानकात फुटलं मित्राच्या हत्येचे बिंग

देव कोटक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाल सुटकेसमध्ये आढळला मृतदेह

point

हत्येचा गुन्हा दाखल

point

'प्रेम' बनले हत्येचे कारण

Mumbai Dadar Crime : दादरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईची लाइफ लाइन म्हणजे लोकल... आणि या लोकलच्या प्रवासात सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक हे दादर आहे. आता या दादर रेल्वे स्थानकावर भयानक घटना उघडकीस आली आहे. माहितीनुसार, दादर रेल्वे पोलिसांनी दोन मूकबधीर व्यक्तींना अटक केली आहे. या दोघांनी त्यांच्या एका मूकबधीर मित्राची हत्या केल्याची माहिती आहे. आरोपी मित्राचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकून दादर रेल्वे स्थानकावरून घेऊन जात असताना संपूर्ण घटनेचं बिंग फुटलं. यावेळी नेमकं काय घडलं हे सविस्तर जाणून घेऊयात. (mumbai dadar crime 2 deaf mute accused murder there friend Pydhonie dead body found in a red suitcase the secret revealed at dadar railway station)

ADVERTISEMENT

दादर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची नोंद पायधुनी पोलीस ठाण्यात केली आहे. पायधुनी पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला नालासोपारा येथून अटक केली आहे. मृत व्यक्ती आणि दोन्ही आरोपी हे मूकबधीर आहेत. 

हेही वाचा : MLA Disqualification : "तुम्ही न्यायालयाला सांगू नका", सरन्यायाधीश चंद्रचूड ठाकरेंच्या वकिलावर भडकले

लाल सुटकेसमध्ये आढळला मृतदेह

अर्शद शेख असे मृत तरुणाचे नाव आहे. तो सांताक्रुझमधील कलिना येथे कुटुंबासोबत राहत होता. तर, जय प्रवीण चावडा आणि शिवजीत सुरेंद्र सिंग अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. जय चावडा याला पायधुनी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे, तर शिवजीतला नालासोपारा येथून अटक करण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

सोमवारी (5 ऑगस्ट) रात्री दादर स्थानकावर जय चावडा लाल रंगाची सुटकेस घेऊन चढत असताना ड्युटीवर असलेल्या दादर रेल्वे पोलीस ठाण्याच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला संशय आला. एवढी जड सूटकेस पाहून त्यांनी यामध्ये काय आहे? असे विचारत त्याची चौकशी केली. पण, मूकबधीर असल्याने जयने उत्तर दिले नाही. 

हेही वाचा : Uddhav Thackeary : विधानसभेच्या हालचाली! ठाकरेंचा तीन दिवस दिल्लीत मुक्काम

हत्येचा गुन्हा दाखल

पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याची सुटकेस तपासण्यासाठी बॅग उघडली आणि सुटकेसमध्ये तरुणाचा मृतदेह पाहून ते थक्क झाले. रेल्वे पोलिसांनी जय चावडाला मृतदेह असलेली सुटकेस ताब्यात घेऊन चौकशीसाठी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात आणले. जय मूकबधीर असल्याचे पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी मुकबधिरांची सांकेतिक भाषा जाणणाऱ्या व्यक्तीला बोलावून त्यांच्यामार्फत जयची चौकशी केली, त्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली. आता या प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

'प्रेम' बनले हत्येचे कारण

पायधुनी पोलिसांनी या हत्याकांडातील दुसरा आरोपी शिवजीत सिंग याला नालासोपारा येथून अटक केली. यानंतर त्याचीही सांकेतिक भाषा समजणाऱ्या व्यक्तीच्या मदतीने चौकशी केली असता अर्शदसोबत वाद झाल्याचे समोर आले. अर्शद ज्या मुलीवर प्रेम करत होता ती जय चावडा याची प्रेयसी होती त्यामुळे अर्शदला जय आणि शिवजीतने डोक्यात हतोडा मारून संपवलं.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Maharashtra Weather : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा इशारा! पहा IMD चा अंदाज

रविवारी (4 ऑगस्ट) जय आणि शिवजीतने अर्शदला पायधुनी येथील घरी पार्टीला बोलावले, त्याला भरपूर दारू पाजली, त्यानंतर शिवजीत आणि जयने मिळून त्याची हत्या केली आणि मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला. त्यानंतर जय आणि शिवजीत मृतदेह असलेल्या सुटकेसची विल्हेवाट लावण्यासाठी दादरला आले. शिवजीत नालासोपाराकडे रवाना झाला आणि जय मृतदेह असलेली सूटकेस घेऊन दादर टर्मिनसला आला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याला ताब्यात घेतले आणि संपूर्ण प्रकरणाचे बिंग फुटले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT