Nagpur : अश्लील फोटो, सेक्शटॉर्शन आणि लव्ह... फोटोग्राफरच्या हत्येची Inside Story
Photographer Vinay Punekar Murder : नागपुरात काही दिवसांपुर्वीच एका फोटो जर्नलिस्टची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. विनय पुणेकर उर्फ बबलू सॅम्युअल पुणेकर (वय 50) असे या फोटो जर्नलिस्टचे नाव होते.
ADVERTISEMENT
Photographer Vinay Punekar Murder : नागपुरात काही दिवसांपुर्वीच एका फोटो जर्नलिस्टची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. विनय पुणेकर उर्फ बबलू सॅम्युअल पुणेकर (वय 50) असे या फोटो जर्नलिस्टचे नाव होते. नागपूरच्या उच्चभ्रू अशा राजनगरमधील सुराणा लेआउटमध्ये ही घटना घडली होती. दिसायला ही हत्या खुप सरळसाधी वाटत असली तर या हत्येमागची इनसाईड स्टोरी खुपच किचकट आहे. कारण या हत्येमागे अश्लील फोटो, सेक्सटॉर्शन आणि लव ट्रॅगल असे अनेक अँगल आहेत. त्यामुळे नेमकी फोटो जर्नलिस्ट विनय पुणेकरची हत्या कशी झाली? हे जाणून घेऊयात. (nagpur photographer vinay punekar murder story girl friend and her boyfriend sextortion blackmailing shocking crime story)
ADVERTISEMENT
मृत विनय पुणेकर हे करिअरच्या सुरुवातीला नागपुर टाइम्समध्ये फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करायचे. मात्र काही काळानंतर त्यांनी फॅशन फोटोग्राफीला सुरुवात केली होती. नवीन नवीन मॉडेल्सचे ते पोर्टफोलिओ बनवायचे. दरम्यान 24 फेब्रुवारीच्या दुपारी विनय पुणेकर त्यांच्या घरातच होते. अचानक त्यांच्या घरातून गोळीबाराचा आवाज आला. हा आवाज ऐकूण स्थानिकांनी त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली असता विनय पुणेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या घटनेनंतर पोलिसांनी पुणेकरचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. तसेच पोलिसांनी या हत्याकांडाचा तपास करायला सुरूवात केली होती.
हे ही वाचा : Navneet Rana यांना महाराष्ट्र सरकारचा 'सुप्रीम' झटका
विनय पुणेकर यांचा काही वर्षापुर्वीच तलाक झाला होता. तेव्हापासून ते घरात एकटेच राहायचे. तसेच पोलीस तपासात पोलिसांच्या हाती आरोपीचा एक फुटेज लागला होता. घरावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात हा आरोपी कैद झाला होता. या फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता.
हे वाचलं का?
पोलिसांनी पुणेकरचा मोबाईल फोन देखील ताब्यात घेऊन कॉल डिटेल्स तपासायला सुरुवात केली होती. या तपासात हत्येपुर्वी पुणेकरला एका तरूणीने दोनदा फोन केल्याचे समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी पुणेकरांच्या मोबाईल फोन आणि इतर गँझेटचा तपास केला असता त्यांच्या हाती अश्लील फोटो आणि व्हिडिओज लागले होते. पुणेकरच्या फोनमध्ये तरूणीसोबतचे काही चॅट देखील होते. या चॅटींगनुसार दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे स्पष्ट होत होतं. पण आता पुणेकरची हत्या याच नात्याने घेतली होती की या हत्येमागे काही वेगळं कारण होतं? याचा तपास पोलीस करीत होती.
हे ही वाचा : NCP ची बँक खाती ताब्यात, मुख्यालयावरही अजितदादांचा दावा
या दरम्यान पोलिसांनी तरूणीचा शोध घेऊन तिची चौकशी केली असता तिने हत्येचा उलगडा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणेकरच्या संपर्कात आलेल्या महिलेचे आधीच लग्न झाले होते. पण ती तिच्या पतीपासून विभक्त झाली होती. या दरम्यान काही वर्षापुर्वी या दोघांची भेट एका स्विमिंग पूलमध्ये झाली होती. या दरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली होती आणि ते एकमेकांच्या जवळ आले होते.
ADVERTISEMENT
नात्यात तिसऱ्याची एन्ट्री
या नात्यादरम्यान महिलेच्या आयुष्यात एका तिसऱ्याची एन्ट्री झाली होती. हेमंत शुक्ला असे या तरुणाचे नाव होते. तो युपीच्या आझमगडचा रहिवासी होता. तो नागपुरमध्ये जिम ट्रेनर म्हणून काम करायचा. या दरम्यान ज्यावेळेस हेमंतला महिला पुणेकरशी संपर्कात असल्याचे कळाले. त्यावेळेस त्याला ती गोष्ट खटकायला सुरुवात झाली. आणि त्याने त्याचा सूड घ्यायचा निर्णय़ घेतला.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, पुणेकेरने महिलेसोबत केलेल्या अश्लील चॅट, व्हिडिओ कॉल आणि ऑडिओकॉलच्या मदतीने हेमंत शुक्लाने पुणेकरला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. गेल्या अनेक महिन्यापासून त्याने पुणेकरला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून हजारो रूपये उकळले होते. या सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून त्याने नागपुरच्या सायबर सेलममध्ये सेक्सटॉर्शऩ आणि ब्लॅकमेलिंगची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पुणेकरला ब्लॅकमेलिंगचे कॉल येणे बंद झाले होते. मात्र हेमंत शुक्लाच्या मनात पुणेकर विरुद्ध प्रचंड राग निर्माण झाला होता.
हत्याकांडात तरूणीचा हात
पोलीस चौकशीत तरुणीने पोलिसांना सांगितले की, शनिवारी हेमंतने मला पुणेकरची घरी जाऊन एकदा भेट घ्यायची आणि त्याला समजावून सांगायचे असल्याचे सांगितले. याच कारणामुळे तरुणीने तिच्या स्कुटीवरून हेमंत शर्माला बसवून पुणेकरच्या राजनगर येथील निवासस्थानी नेले. पण हेमंतच्या डोक्यात काही वेगळंच कटकारस्थान रंगत होतं.
हेमंत पुणेकरच्या घऱी गेल्यावर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणानंतर हेमंतने रागाच्या भरात बंदुक काढून पुणेकर दोन राऊंड फायर करून त्याची हत्या केली. या हत्येनंतर हेमंत तरूणीच्या स्कुटीजवळ पोहोचला, तेथून दोघांनी स्क्रुटीवरून प्रवास केल्यानंतर हेमंत फरार झाला होता. पोलीस आता हेमंतचा तपास करत आहेत.
या हत्याकांडात पोलिसांना हेमंत शुक्लासोबत त्या तरूणीचाही हात असल्याचा संशय आहे. पुणेकरांच्या सवयीचा फायदा घेऊन दोघेही त्याला ब्लॅकमेल करत असल्याचाही पोलिसांना संशय आहे. आणि ज्यावेळेस पुणेकरने ब्लॅकमेलिंगची पोलीस ठाण्यात तक्रार केली, त्यानंतर दोघांनी त्याचा काटा काढण्याचा निर्णय़ घेतला होता.
सेक्सटॉर्शन रॅकेटचा संशय
पोलिसांना या हत्याप्रकरणात अनेक खळबळजनक खुलासे हाती लागले आहेत. आरोपी तरुणी हेमंतच्या साथीने गेल्या 3 वर्षांपासून सेक्सटॉर्शन रॅकेट चालवत होती. पुणेकर व्यतिरिक्त हे दोघे आणखी 7 जणांसोबत सेक्सटॉर्शन करत होते. तरुणी फोनवर अशा लोकांशी अश्लील चॅट करत असे, ज्यामध्ये न्यूड व्हिडिओ कॉलही केले जात होते. त्याचा मित्र हेमंत त्यांचे व्हिडीओ काढायचा किंवा ग्रॅप घ्यायचा आणि ब्लॅकमेलिंग करायचा. आधी तरुणीने आणि हेमंतने विनयलाही आपल्या टोळीत सामील करून घेण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र त्याने नकार दिल्याने त्यांनी त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT