Saif Ali Khan Attack: नाव शाहिद, याआधीही त्याने... सैफवर हल्ला करणारा आहे महाभयंकर आरोपी!
Saif Ali Khan Attack Accused: सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीची आता नेमकी माहिती समोर आली आहे. हा आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं आता पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अभिनेता सैफवर चाकूने हल्ला करणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात

आरोपीने याआधीही केल्या आहेत जबरी घरफोड्या

पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू
Saif Ali Khan Attack: दिपेश त्रिपाठी, मुंबई: सैफ अली खानवर सहा वेळा चाकूने वार करणाऱ्या संशयिताची नेमकी ओळख आता समोर आली आहे. संशयित आरोपीचे नाव शाहिद असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई पोलीस सध्या आरोपी शाहिदची चौकशी करत आहेत. मुंबईतील ताडदेव पोलीस स्टेशनच्या पथकाने त्याला गिरगाव येथील फॉकलंड रोड येथून ताब्यात घेतले आहे. (name shahid had broken into 5 houses earlier too the identity of person arrested for attacking saif ali khan has been revealed)
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहिदविरुद्ध घरफोडीचे 4-5 गुन्हे आधीच दाखल आहेत. तथापि, शाहिद हाच सैफ अली खानवर हल्ला करणारा व्यक्ती आहे की नाही याची पुष्टी अद्याप तरी पोलिसांनी केलेली नाही. सध्या पोलीस शाहिदला संशयित मानून त्याची चौकशी करत आहेत.
अभिनेता सैफवर 6 वेळा करण्यात आला चाकूने हल्ला
खरं तर, बुधवारी (15 जानेवारी) रात्री 2 वाजेच्या सुमारास अभिनेता सैफ अली खान याच्या घरात चोर घुसला. सैफच्या मुलांना सांभाळणाऱ्या बाईने चोराला घरात पाहिलं आणि तिने जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. हाच आरडाओरडा ऐकून सैफ अली खान हा झोपेतून जागा झाला आणि त्याने आवाजाच्या दिशेने तात्काळ धाव घेतली. यावेळी आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी त्याने चोराशी झटापट केली. पण यावेळी चोरट्याने सैफवर थेट चाकूने हल्ला चढवला आणि एकामागून एक तब्बल सहा वार केले.
डॉक्टरांनी सैफच्या मणक्यातून बाहेर काढला चाकूचा तुकडा
चाकूने झालेल्या 6 जखमांपैकी 2 जखमा या खूप खोल होत्या. या दोन्ही जखमा पाठीच्या आणि मानेजवळ आहेत. सैफच्या मणक्यावर वार केल्यानंतर चाकूचा 2.5 इंचाचा भाग तुटला आणि तो मणक्याजवळच अडकून राहिला. असे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे हा तुकडा मणक्याजवळून तात्काळ काढून टाकला.
मुलांच्या खोलीत झाला सैफवर हल्ला
या हल्ल्यात सैफच्या घरातील मोलकरीणही जखमी झाली. मात्र, तिला किरकोळ दुखापत झाली. या घटनेतील धक्कादायक गोष्ट म्हणजे मुलांच्या खोलीत सैफवर धारदार वस्तूने हल्ला करण्यात आला.