Nanded Crime : "तू पाटील, तुझी लायकी नाही..." म्हणत तरूणाला मारहाण, मारहाणीनंतर प्रियकरानं स्वत:ला संपवलं
सुगाव येथील नितीन शिंदे या तरुणाचं थुगावमधील तरुणीशी प्रेमसंबंध होते. तीन-चार वर्षांपूर्वी दहावीत शिकत असताना दोघांची मैत्री झाली होती. त्यानंतर पुढे त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झालं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

प्रेयसीच्या घरच्यांनी धमक्या दिल्यानंतर तरूणानं स्वत:ला संपवलं...

नितीन शिंदे या तरूणानं स्वत:ला संपवताना काय लिहून ठेवलं?

कुटुंबाने मारहाण करत दिली होती बदनामी करण्याची धमकी
Nanded Crime News : "आमच्या मुलीशी तू का बोलतोस" असं म्हणत नांदेडमध्ये नातेवाईकांनी तरुणाला मारहाण केली. गावात तुझी बदनामी करु, अशी धमकीही कुटुंबानं दिली. या भीतीपोटी नितीन नावाच्या 19 वर्षीय तरुणानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नांदेड शहराजवळील सुगावमध्ये सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी लिंबगाव पोलिस ठाण्यात प्रेयसीसह सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन प्रभू शिंदे असं मृत तरुणाचे नाव आहे.
दहावीत ओळख, नंतर प्रेम संबंध
सुगाव येथील नितीन शिंदे या तरुणाचं थुगावमधील तरुणीशी प्रेमसंबंध होते. तीन-चार वर्षांपूर्वी दहावीत शिकत असताना दोघांची मैत्री झाली होती. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. वर्षभरापूर्वी मुलीच्या कुटुंबीयांना त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. यावेळी कुटुंबीयांनी दोघांना समजावलं.
हे ही वाचा >> उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अत्यंत वादग्रस्त कविता करणारा कुणाल कामरा आहे तरी कोण?
"आम्ही देशमुख, तू पाटील..."
सहा महिन्यांपूर्वी मुलीच्या चुलत भावानं नितीनला तिच्याशी फोनवर का बोलतो, अशी विचारणा करत मारहाण केली होती. त्यानंतर 18 मार्च रोजी तो कामावरून घरी परतत असताना तरुणीच्या कुटुंबीयांनी त्याला पुन्हा मारहाण केली. ‘आम्ही देशमुख, तू पाटील आहेस, तू आमच्या लायकीचा नाहीस, तुला रस्त्यावर आणू’, असं म्हणत मारहाण करून तुकडे तुकडे करण्याची धमकी दिली. त्यानंतर भीतीपोटी नितीन शिंदे नावाच् या तरुणाने राहत्या घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
भोसले कुटुंबातील लोकांवर गुन्हा दाखल
दरम्यान, याप्रकरणी प्रभू शिंदे यांच्या फिर्यादीवरून ज्ञानदेव भोसले, संतोष भोसले, विक्रम भोसले, अर्जुन भोसले, नितीन भोसले, संतोष भोसले यांच्यासह तरुणीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लिंबगाव पोलीस तपास करत आहेत. प्रेमप्रकरणातून या तरुणाने आत्महत्या केली. आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नितीनच्या कुटुंबीयांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.