Vanraj Andekar Murder CCTV: माजी नगरसेवक वनराज आंदेकरांचा खून नेमका झाला कसा? हादरवून टाकणारा Video आला समोर
Vanraj Andekar Murder News : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना आता धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भर चौकात हत्या करण्यात आली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भर चौकात हत्या करण्यात आली.
वनराज आंदेकर यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी
Vanraj Andekar Murder News : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना आता धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भर चौकात हत्या करण्यात आली. रविवारी (1 सप्टेंबर) रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास काही अज्ञातांनी गोळ्या झाडून ही हत्या केली. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावरही धारदार शस्त्रांनीही हल्ला करण्यात आला. पुण्यातील नाना पेठ येथील डोके तालमीच्या समोर हत्येचा हा थरार घडला. (ncp ex corporator vanraj andekar shot dead in pune CCTV video viral)
ADVERTISEMENT
घटना घडताच तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने वनराज आंदेकर यांना रुग्णालयात हलवले पण गोळीबारात अधिक रक्तस्त्राव झाल्याने आंदेकर यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा : Maharashtra Weather: राज्यात पावसाचा जोर वाढला! मराठवाड्याला अतिवृष्टीचा इशारा, मुंबई-पुण्यात IMD चा अंदाज काय?
वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या 3 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरु आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या निधनाबाबत पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा म्हणाले, "रात्री साडेनऊच्या सुमारास वनराज आंदेकर (अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे माजी नगरसेवक) त्यांच्या चुलत भावासह इमानदार चौकात उभे होते. काही लोकांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. "
हे वाचलं का?
पुण्यात गुंड शरद मोहोळ यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : Today Horoscope : 'या' राशीच्या लोकांना मिळणार पैसाच पैसा! जाणून घ्या आजचं राशी भविष्य
वनराज आंदेकर यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
माहितीनुसार, वनराज यांच्यावर हल्ला झाला तेव्हा तो नाना पेठेतील डोके तालीम परिसरात राहत होता, असे सांगण्यात येत आहे. यादरम्यान हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच ते सहा राऊंड फायर केले. वनराज यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी परिसरातील लाईट घालवण्यात आली होती.
ADVERTISEMENT
आंदेकर यांचा काही घरगुती कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी किंवा कार्यकर्ते नव्हते. हल्लेखोरांनी नेमकी हीच संधी साधून त्यांच्यावर हल्ला केला. आधी बाईकवरुन आलेल्या तीन ते चार जणांनी वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना तातडीने केएम रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतू त्यांचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Pink Rickshaw Yojana : 'लाडकी बहिण'नंतर महिलांसाठी पिंक ई रिक्षा योजना, कुणाला मिळणार लाभ?
कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी
वनराज 2017 च्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. वनराजची आई राजश्री आंदेकर आणि काका उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक राहिले आहेत. वनराज यांची बहीण वत्सला आंदेकर या पुण्याच्या महापौर झाल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT