Crime : ‘सॉरी जान.. 2 दिवस उशीर झाला’, फोटो शेअर केला अन् नवविवाहितेने…
राजस्थानच्या (Rajsthan) बाडमेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.एका नवविवाहितेने लग्नाच्या दोनच दिवसात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनिता असे या (22) वर्षीय नवविवाहितेचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी नवविवाहितेने सोशल मीडियावर एका तरूणासोबत फोटो शेअर केला होता.
ADVERTISEMENT
राजस्थानच्या (Rajsthan) बाडमेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.एका नवविवाहितेने लग्नाच्या दोनच दिवसात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनिता असे या (22) वर्षीय नवविवाहितेचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी नवविवाहितेने सोशल मीडियावर एका तरूणासोबत फोटो शेअर केला होता. या पोस्टमध्ये ”तू माझ्या आयुष्यात नेहमीच राहशील, दोन दिवस उशीर झाला यासाठी माफ करशील” असे म्हणत तिने टोकाचं पाऊल उचललं आहे. नवविवाहितेच्या आत्महत्येच्या घटनेने आता एकच खळबळ माजली आहे. शोभाला जेतमाल परीसरात ही घटना घडली आहे. (newly married women commits suicide by writing 2 days late sorry dear badmer rajasthan crime story)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनूसार, शोभाला जेतमालची रहिवासी असलेली अनीता (22) आणि पुरखाराम (28) हे दोघेही नात्यात होते. दोघेही एका स्पर्धेची तयारी करत होते. या दरम्यान 4 जुलै रोजी अनीता हिचे कुटुंबियांनी लग्न लावून दिले होते. ही घटना पुरखारामला कळताच त्याची निराशा झाली आणि त्याने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. यावेळी 5 जुलै रोजी ज्यावेळेस नवविवाहिता अनिता तिच्या घरी परतली असता तिला प्रियकर पुरखारामचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. या घटनेने नवविवाहितेला मोठा धक्का बसला.
हे ही वाचा : Crime : मित्राच्या बायकोसोबत संबंध अन् झाला भयंकर अंत, तिसऱ्या मजल्यावरून…
नवविवाहिता शुक्रवारी 7 जुलैला सकाळी दुधाचे भांड घेऊन जनावरांच्या गोठ्यात गेली होती. यावेळी अनेक तास उलटून देखील ती घरी परतली नसल्याने कुटुंबियांनी तिची शोधाशोध सूरू केली होती. यावेळी नवविवाहितेच्या पायांचे ठसे पाहून कुटुंबीय विहरीपर्यंत पोहोचले. दुधाचे भांडण विहिरीच्या जवळच होते, तर नवविवाहितेचा मृतदेह विहिरीत तरंगत होता. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोस्टमार्टम पुर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला होता.
हे वाचलं का?
लग्नाच्या दिवशीच प्रियकराची आत्महत्या
अनिताचे लग्न 4 जुलै रोजी झाले होते आणि ती तिच्या सासरी गेली होती.लग्नाच्याच दिवशीच प्रियकर पुरखारामचा विहिरीत बुडून मृत्यू झाला होता. पुरखारामच्या कुटुंबियांच्या त्याने आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. या घटनेच्या दोनच दिवसानंतर पुरखारामने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मात्र पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची तक्रार मृतांच्या नातेवाईकांनी दाखल केली आहे.
हे ही वाचा : Crime: अनैतिक संबंधाला विरोध, जवानाने पत्नीसह दोन महिन्याच्या बाळाला जिवंत जाळलं
विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी अनिता एक सोशल मीडिया पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये अनिताने तिच्या प्रियकराचा फोटो लावून लिहले आहे की, ”आपण जीवन मरणाची शपथ घेतली होती.मग तू एकट्याने असे पाऊल का उचललेस…”, अनिता पुढे लिहते,”या क्रुर जगात मला एकटा सोडून का गेलास?”, ”हरकत नाही, आता मीच तुमच्याकडे येते”. ”तू माझ्या आयुष्यात नेहमीच राहशील, दोन दिवस उशीर झाला यासाठी माफ करशील” असे म्हण अनिताने टोकाचं पाऊल उचललं आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान धोरीमन्ना पोलीस ठाण्याचे अधिकारी सुखराम बिश्नोई या घटनेवर म्हणाले की, 22 वर्षाची नवविवाहिता अनिताने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.सुसाईडपुर्वी मृतकाने स्टेटसही ठेवला होता. प्राथमिक माहितीनूसार प्रेम करणातून ही घटना घडल्याची माहिती आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT