हनिमूनच्या रात्री नवरीने केला मोठा कांड, नवऱ्या मुलाला बसला मोठा शॉक!
हनिमूनच्या रात्रीच नवविवाहित वधूने नवऱ्या मुलाकडील सगळे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT

महाराजगंज: उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे नवविवाहित वधू ही हनिमूनच्या रात्रीच पळून गेली. एवढेच नाही तर तिने लाखो रुपयांचे दागिनेही पळवून नेले. ज्यानंतर नवरा मुलगा आता पोलीस स्टेशनच्या चकरा मारत आहे. सध्या त्यांनी एफआयआर दाखल केला आहे. त्यामुळे पोलिसांनी वधूचा शोध सुरू केला आहे.
खरंतर, हे संपूर्ण प्रकरण महाराजगंजच्या घुगली पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथील रहिवासी मनीषचे लग्न 7 फेब्रुवारी रोजी कोठीबार परिसरातील एका मुलीशी झाले होते. 10 फेब्रुवारी रोजी वधू तिच्या सासरच्या घरी आली. घरात गर्दी असल्याने, नवऱ्या मुलीच्या नणंदेने तिचे दागिने नववधूच्या खोलीतच ठेवले होते.
नेमकं प्रकरण काय?
पीडित पतीचे म्हणणे आहे की, लग्नाच्या वेळी त्याने पत्नीला साडेतीन लाख रुपयांचे दागिने दिले होते. तर सुमारे अडीच लाख रुपयांचे दागिने हे त्याच्या बहिणीचे होते. पण हे सगळे दागिने घेऊन नवविवाहित वधूने पोबारा केला आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पतीने लिहिले आहे की, 11 फेब्रुवारीच्या रात्री 8 वाजताच्या सुमारास सर्वजण कुटुंब आणि नातेवाईकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात व्यस्त होते, तेव्हा वधूला संधी मिळाली. त्याचवेळी तिने खोलीत ठेवलेले सर्व दागिने चोरून नेले.
रात्रभर वधूचा शोध घेण्यात आला पण ती कुठेही सापडली नाही, म्हणून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. तिच्या पालकांनाही तिच्याबाबत काहीही माहिती नाही. पीडितेच्या पतीने वधूच्या कुटुंबावरही या घटनेत सहभागी असल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणात, महाराजगंजचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणाले की, घुघली पोलिस स्टेशन परिसरात रामपूर बलदिहा नावाचे एक गाव आहे. तिथल्या एका व्यक्तीने लेखी तक्रार दिली आहे की त्याचे कोठीबार पोलीस स्टेशन परिसरात लग्न झाले होते. परंतु लग्नानंतर त्याची पत्नी सासरच्या घरातून दागिने घेऊन पळून गेली. सध्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील कारवाई केली जात आहे.