लग्नाची Anniversary अन् पती-पत्नीने दिला जीव, आत्महत्येआधी Video केला शेअर

योगेश पांडे

Nagpur Husband-Wife Suicide: 26व्या लग्नाच्या वाढदिवशीच नागपूरमधील एका विवाहीत जोडप्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

पती-पत्नीने दिला जीव, आत्महत्येआधी Video केला शेअर
पती-पत्नीने दिला जीव, आत्महत्येआधी Video केला शेअर
social share
google news

Nagpur Crime: नागपूर: नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टिननगर परिसरातून एक वेदनादायक घटना समोर आली आहे. जिथे पती-पत्नीने 26 व्या लग्नाच्या वाढदिवशीच आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. पती-पत्नीच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (on their 26th wedding anniversary the couple wore wedding attire and then committed suicide)

या घटनेबाबत जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी सांगितले की, मयत दांपत्य जेरील डॅस्मन ऑस्कर मोनक्रिफ (वय 48 वर्ष) आणि ॲनी जेरील मोनक्रिफ (वय 45 वर्ष) हे अनेक दिवसांपासून अपत्य होत नसल्याने आणि बेरोजगारीने त्रस्त होते. लग्नाला 26 वर्षे झाली तरी त्यांना मूलबाळ झाले नव्हते.

हे ही वाचा>> अचानक सगळ्यांना पडतंय टक्कल... गावकरी हादरले, बुलढाण्यात 'या' Virus ची भीती!

पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली

7 जानेवारी 2025 रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. या दिवशी, आत्महत्या करण्यापूर्वी, त्यांनी आपल्या लग्नातील पोशाख परिधान केला होता, त्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ शूट केला आणि त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर अपलोड केला. यानंतर त्यांनी राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हे ही वाचा>> Kolhapur Crime: भाचीच्या लग्नाचं रिसेप्शन, मामाने जेवणात कालवलं विष अन्... असं केलं तरी का?

पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी भादंवि कलम 194 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ निरीक्षक क्षीरसागर यांनी सांगितले की, या दाम्पत्याकडून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. पण अपत्य नसणं आणि बेरोजगारी यामुळे तणावातून ही आत्महत्या केलेली असू शकते.

पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला

या घटनेने परिसरात शोक व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपुरात अशी प्रकरणे सातत्याने वाढत आहेत, यातून मानसिक आरोग्य आणि आर्थिक दबावाचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp