Paytm च्या फिल्ड मॅनेजरच्या आत्महत्येनंतर पत्नीनेही केले विष प्राशन, धक्कादायक माहिती आली समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

paytm field manager suicide
paytm field manager suicide
social share
google news

बातम्या हायलाइट

point

Paytm च्या फिल्ड मॅनेजरच्या आत्महत्येनंतर पत्नीनेही केले विष प्राशन

point

मॅनेजरच्या आत्महत्येनंतर पत्नीनेही केले विष प्राशन

MP News: इंदौरमध्ये पेटीएमचे फील्ड मॅनेजर असलेल्या गौरव गुप्ता यांच्या आत्महत्येमुळे ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आत्महत्यानंतर आता तिसऱ्या दिवशी गौरवच्या पत्नीनेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यांच्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांचा जीव वाचला आहे.

ADVERTISEMENT

गौरव गुप्ताच्या मृत्यूनंतर ही घटना घडली ती बुधवारी. गौरवची पत्नी मोहिनीने त्यांच्याच घरात विष प्राशन केले होते. मात्र तिने ही घटना कोणालाच सांगितली नाही. विष प्राशन करून ती जेव्हा बाथरूममध्ये गेली तेव्हा मात्र ती बाथरुममध्येच पडली.

तेव्हा तिच्या घरच्यांनी तिला मदत केली. त्यानंतर घरच्या लोकांनी तिने विष प्राशन केल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले आणि उपचार सुरु केले. त्यामुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> जयाप्रदा फरार! न्यायालयानं काढलं अटक वॉरंट, नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणातून आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गौरव गुप्ताचा चुलत भावाने सांगितले की, तसेच त्याने दावाही केला आहे की, मोहिनी गुप्ताने आठवड्याभरापूर्वीच विष प्राशन करणार होती, त्यामुळे गौरव गुप्ता तणावात होता.  

या प्रकरणाची माहिती देताना पत्नी मोहिनीने सांगितले होते की, गौरव हा नोकरीवरून काढून टाकतील म्हणून तो तणावात होता. त्या भीतीमुळेच त्याने आत्महत्या केली तर गौरवचा भाऊ म्हणतो की, नीरजला नोकरीवरून काढून टाकण्याची भीती नव्हती तर कारण त्याला इतर ठिकाणीही नोकरीची ऑफर्स होती. गौरवचे वार्षिक पॅकेज नऊ लाखाचे होते. तरीही गौरवने का आत्महत्या केली हे मात्र अजून आम्हालाच समजले नाही असंही त्याच्या भावाने सांगितले.  

ADVERTISEMENT

मध्य प्रदेशातील मिनी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदौरमध्ये असलेल्या पेटीएमचे फिल्ड ऑफिसर गौरव गुप्ता यांनी 25 फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह ग्वाल्हेरला पाठवण्यात आला होता, त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले होते.  

ADVERTISEMENT

गौरव गुप्ता यांचा आठ वर्षापूर्वी विवाह झाला होता, त्यानंतर त्यांनी नोकरीनिमित्त इंदौरमध्ये पत्नी आणि दोन मुलींसह संसार थाटला होता. मात्र आता अचानक त्यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

हे ही वाचा >> 'मैं अपनी झांसी नहीं दूंगी' भावना गवळींनी ठणकावून सांगितलं

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT