पोलीस अधिकाऱ्याने पोलीस स्थानकातच स्वतःवर गोळी झाडली, आत्महत्येचं नेमकं कारण काय?
पोलीस अधिकाऱ्याने पोलीस स्थानकातच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मात्र अद्याप आत्महत्येचं कारण स्पष्ट झाले नाही.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पोलीस स्थानकातच पोलीस अधिकाऱ्यानं संपवलं आयुष्य
पोलिसानं स्वतःच्याच डोक्यात झाडली गोळी
पोलीस ठाण्यातच पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या
Nashik Suicide : नाशिकमधील अंबड पोलीस (Nashik Ambad Police) स्थानकात पोलीस निरीक्षकाने स्वतःच्या रिव्हॉलवरमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याने नाशिकसह पोलीस दलात खळबळ माजली आहे. अंबड पोलीस स्थानकामध्येच सहाय्यक पोलीस निरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
स्वतःवरच झाडली गोळी
सहायक पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी आज मंगळवारी सकाळी दहा वाजता नाशिक शहरातील अंबड पोलीस स्थानकामध्ये आपल्या स्वतःच्या पिस्तुलमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे मात्र त्यामागील अद्याप कारण समजू शकले नाही.
हे ही वाचा >> छगन भुजबळांच्या मागणीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या, नेमकी मागणी काय?
कारण अद्याप अस्पष्ट
अशोक नजन यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी, कौटुंबीक ताणतणावाच्या कारणामुळेच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशोक नजन सकाळी लवकरच ते पोलीस स्थानकात आले होते, मात्र बराच वेळ झाला तरी ते बाहेर आले नव्हते, त्यानंतर काही वेळातच त्यांनी गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यानंत त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या खोलीत जाऊन पाहिल्यानंतर त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
हे वाचलं का?
वरिष्ठ अधिकाऱ्यांची धाव
अशोक नजन यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे कळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अंबड पोलीस स्थानकाकडे धाव घेतली. याबाबत कोणत्याही अधिकाऱ्याने अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, आदल्या दिवशी ते रात्री उशिरापर्यंत बंदोबस्तानंतर ते घरी परतले होते.
हे ही वाचा >> महायुतीत शिवसेनेला झुकतं माप, अजित पवार गटाला 4 जागा?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT