Pune Crime : ‘तुलाही गोळी घालेन’, पत्नी-पुतण्याच्या हत्येपूर्वी काय घडलं?
सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना 24 जुलै रोजी घडली. भारत गायकवाड यांनी नंतर स्वतःही गोळी झाडून घेत आत्महत्या केली.
ADVERTISEMENT
Pune baner Crime News : सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना 24 जुलै रोजी पुण्यात घडली. भारत गायकवाड यांनी नंतर स्वतःही गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्यांनी हे पाऊल का उचललं, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान, याबद्दलची काही महत्त्वाची माहिती समोर आलीये.
अमरावती पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्त असलेल्या भारत गायकवाड यांनी गोळ्या झाडून पत्नी मोनी गायकवाड आणि पुतण्या दीपक गायकवाड याची हत्या केली. भारत गायकवाड हे 15 जुलै रोजी सुट्टी घेऊन पुण्यातील घरी आले होते. त्यांचं कुटुंब इथेच राहते.
बाणेर येथे राहणारे भारत गायकवाड सुट्टीवर येत असतं. ते आल्यानंतर त्यांचा पुतण्याही त्यांच्या घरी यायचा. तो पुण्यातीलच धायरीत राहायचा. पण, सोमवारची (24 जुलै) पहाट गायकवाड कुटुंबीयांसाठी धक्कादायक ठरली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
पुणे क्राईम : गायकवाड यांच्या घरी काय घडलं?
पुतण्या दीपक गायकवाड हा बाणेर येथे काका भारत गायकवाड यांच्याकडे आला होता. रविवारी म्हणजे 23 जुलै रोजी तो काकासाठी मटण घेऊन आलेला. तो नेहमी त्यांच्यासाठी मटण घेऊनच यायचा. रविवारी पाऊस सुरू असल्याने दीपक तिथेच थांबला.
वाचा >> दोन्ही राष्ट्रवादींना घसघशीत फायदा! ठाकरे गट, काँग्रेस आमदारांचे हात रिकामे
सकाळी 3.30 ते 4 वाजेच्या सुमारास भारत गायकवाड यांच्या खोलीतून गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यानंतर कुटुंबातील इतरांसह दीपकनेही रुमकडे धाव घेतली. भारत गायकवाड यांचा मुलगा सुहासने दुसरी चावी आणून त्यांच्या रुमचा दरवाजा उघडला.
ADVERTISEMENT
दार उघडले आणि काकाने घातली गोळी
दार उघडल्यानंतर दीपक गायकवाड आत शिरला. आत पाऊल ठेवताच भारत गायकवाड यांनी त्यांच्यावर गोळी झाडली. तो जागेवरच पडला. त्यानंतर मुलगा सुहास खोली गेला. त्यावर भारत गायकवाड यांनी तू बाहेर जा, नाहीतर तुलाही गोळी घालेन, असा दम दिला. आणि त्यानंतर लगेच भारत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली.
ADVERTISEMENT
Afzal Guru ला फाशी देताच जेलर ढसाढसा रडला, कधीही समोर न आलेला ‘हा’ किस्सा जरूर वाचा!
भारत गायकवाड यांचा मोठा मुलगा हर्षवर्धन हा जुन्या गाड्या खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय करतो. तर त्यांचा लहान मुलगा सुहास हा हॉटेल मॅनेजमेंट करतो. भारत गायकवाड यांची सहायक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती झाली होती. त्यांच्या निवृत्तीला आता दहा महिनेच शिल्लक राहिले होते.
ADVERTISEMENT