Prajwal Revanna Brother : फार्महाऊसवर अनैसर्गिक सेक्स, एचडी देवगौडा यांचा दुसरा नातू अडकला सेक्स स्कँडल प्रकरणात

मुंबई तक

ADVERTISEMENT

prajwal ravanna brother suraj revanna arrested unnatural sex with jds worker karnataka sex scandle case
कर्नाटक सेक्स स्कँडलमध्ये अडकलेला प्रज्वल रेवन्ना याचा भाऊ सूरज रेवन्ना यालाही हसन पोलिसांनी अटक केली आहे.
social share
google news

Prajwal Revanna Brother Arrested : कर्नाटक सेक्स स्कँडल (Karnatak Sex Scandle) प्रकरणात  जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) याला अटक करण्यात आली असतानाच आता त्याचा सख्खा भाऊ सुरज रेवण्णालाही (Suraj Revanna) लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत फार्महाऊसवर अनैसर्गिक सेक्स केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या घटनेने आता कर्नाटकमध्ये खळबळ माजली आहे. (prajwal ravanna brother suraj revanna arrested unnatural sex with jds worker karnataka sex scandle case) 

ADVERTISEMENT

कर्नाटक सेक्स स्कँडलमध्ये अडकलेला प्रज्वल रेवन्ना याचा भाऊ सूरज रेवन्ना यालाही हसन पोलिसांनी अटक केली आहे. सूरजवर जेडीएस कार्यकर्त्यासोबत अनैसर्गिक सेक्स केल्याचा आरोप आहे. त्यामुळे कर्नाटक पोलिसांनी शनिवारी जेडीएस एमएलसी सूरज रेवन्ना याच्याविरुद्ध  27 वर्षीय कार्यकर्त्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सूरज रेवन्ना यांच्या जवळच्या सहकाऱ्याने कथित पीडितेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. 

हे ही वाचा : शिवसेना शिंदे गटात राजकीय पिंगा, माजी नगरसेवक म्हणाले मलाच...

याप्रकरणी आता होलेनर्सीपुरा ग्रामीण पोलिसांनी सूरज रेवन्ना आणि शिवकुमार या दोघांविरुद्ध आयपीसी कलम 377 (अनैसर्गिक शारीरिक संभोग), 342 (बंदिस्त), 506 (शांतता भंग करण्याच्या हेतूने केलेला अपमान) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. पीडितेने हासनमध्ये वैद्यकीय चाचण्या करण्यास नकार दिला होता, त्यानंतर तिची बेंगळुरू येथील बोअरिंग हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी पीडितेचे बीपी, शुगर, ईसीजी, शरीरावरील खुणा तपासल्या आहेत. आज पॉटेन्सी टेस्ट होणार आहे.

हे वाचलं का?

FIR मध्ये काय? 

पोलिसांनी एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनूसार, सूरज रेवन्ना याने पीडितेला 16 जून रोजी संध्याकाळी 6.15 वाजता हसन जिल्ह्यातील होलेनर्सीपुरा येथील फार्महाऊसवर बोलवला होतं. या फार्महाऊसवर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे. सुरजने कपडे उतरवायला लावले आणि लैंगिक अत्याचार केले. याबदल्यात त्याने नोकरीचे आमीष आणि राजकारणात आणण्याचे आश्वासन दिले होते. तसेच या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास तुझ्या कुटुंबाला ठार मारले जाईल, अशी धमकीही दिली होती.

हे ही वाचा : विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच, मतांचा कोटा ठरवणार जागा कोणाची?

पीडितेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिने शिवकुमारला या घटनेची माहिती दिली होती आणि न्यायासाठी लढा देण्यास सांगितले. यानंतर शिवकुमारने तोंड न उघडण्याच्या बदल्यात तिला 2 कोटी रुपयांची ऑफर दिली. या घटनेनंतर पीडीत घाबरून बंगळुरूला पळाला होता. दरम्यान पीडितेने 5 कोटी रुपयांची मागणी केली आणि नंतर 2 कोटी रुपयांमध्ये सेटलमेंट केल्याचा खोटा आरोप शिवकुमारने केल्याचा पीडितेने म्हटले आहे. 

ADVERTISEMENT

दरम्यान या प्रकरणाने आता प्रज्वल्ल रेवण्णा सोबत त्याचा भाऊ सुरद रेवण्णा देखील सेक्स स्कॅन्डल प्रकरणात अडकताना दिसत आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT