Pune Crime : प्रेम, संशय आणि हत्या, IT इंजिनियर गर्लफ्रेंडला लॉजवरच घातल्या गोळ्या
पुण्यातील एका बड्या कंपनीत आयटी क्षेत्रात इंजिनियर असलेल्या वंदना द्विवेदीचा बॉयफ्रेंड लखनऊमधून तिला भेटायला आला. त्यानंतर ती दोघं एकत्र हॉटेलवर राहायलाही गेली मात्र त्यानंतर त्या दोघांचा वाद झाला आणि वंदना द्विवेदीला एका रात्रीतच संपवण्यात आलं, पण नंतर पोलिसांनी जे सांगितलं ते कारण ऐकून मात्र अनेक जण हादरून गेले आहेत.
ADVERTISEMENT

Pune Murder : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील अनेक घटनांनी मोठी खळबळ माजली असतानाच एका आयटी अभियंता तरुणीची हत्या झाल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. पुण्यातली हिंजवडीमध्ये (Hinjewadi) प्रेमप्रकरणातून लॉजवरच गोळ्या झाडून हत्या (Girlfriend Murder) करण्यात आल्यानंतर आता पोलिसांनी प्रियकरालाही ताब्यात घेतले आहे. यामध्ये ठार झालेल्या तरुणीचं नाव वंदना द्विवेदी असून पोलिसांनी फरार झालेल्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.
लखनऊमधून पुण्यात आला
वंदना आणि ऋषभ निगम ही दोघं गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होती. त्यांच्या त्या ओळखीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले होते. आयटी इंजिनीअर असलेल्या वंदना द्विवेदी ही हिंजवडीमधील पुण्यात एका नामांकित कंपनीमध्ये नोकरीला होती. तर ऋषभ हा लखनऊमध्ये राहत होता.
हे ही वाचा >> Maratha Reservation : जरांगे-पाटलांची पहिली मोठी घोषणा, ‘नोंदींच्या आधारे एक तरी…’
प्रेमातूनच संशय बळावला
ऋषभ निगम हा लखनऊमध्ये नोकरीला होता, मात्र या दोघांचं एकमेकांवर प्रेम असल्यामुळे ती दोघं भेटत होती. त्यामुळे तो 25 जानेवारीलाही वंदनाला भेटण्यासाठी पुण्यात आला होता. त्यांनी हिंजवडी येथील हॉटेल ओयो टाऊन हाऊसमध्ये 306 क्रमांकाची खोलीही बुक केली होती. 25 जानेवारीपासून ती दोघंही हॉटेलमध्ये थांबली होती. मात्र त्या काळातच त्या दोघांचा वाद झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ऋषभ निगमला वंदनाच्या चारित्र्यावर संशय होता, त्यावरूनच त्या दोघांमध्ये वाद झाला होता. याआधीही त्या दोघांचा वाद झाला असावा त्यामुळे ऋषभ वंदनाला मारण्याच्याच हेतून आला असावा अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
सीसीटीव्हीत आरोपी कैद
पोलिसांनी सांगितले की, रात्री 10 नंतर ऋषभने वंदना द्विवेदीची हत्या करून खोलीतून बाहेर आल्याचे सीसीटीव्हीत कैद झाल्याचेही सांगितले आहे. त्यानंतर तो मुंबईच्या दिशेने पळून गेला होता, मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.