Pune: ठोसा मारताच मोडलं नाक अन्… दुबईत बर्थडे करायचा होता पतीने नकार देताच महिलेचं जीवघेणं कृत्य!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Pune crime News for not taking Dubai to celebrate birthday Wife Punched her husband on nose and he died
Pune crime News for not taking Dubai to celebrate birthday Wife Punched her husband on nose and he died
social share
google news

Crime News: पत्नीला दुबईला न नेणं एका व्यक्तीला खूपच महागात पडलं. यामुळे संतापलेल्या पत्नीने पतीच्या चेहऱ्यावर एवढा जोरात ठोसा मारला की त्याचे नाक आणि दात तुटले. यात अतिरक्तस्रावामुळे पतीचा धक्कादायक मृत्यू झाला. पत्नीला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. (Pune crime News for not taking Dubai to celebrate birthday Wife Punched her husband on nose and he died)

ADVERTISEMENT

हे प्रकरण पुण्यातील आहे. शुक्रवारी (24 नोव्हेंबर 2023) पुण्यातील वानवडी भागात असलेल्या एका पॉश निवासी सोसायटीतील अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. खरं तर, पत्नीला तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईला जायचे होते, परंतु पतीने नकार दिला. यानंतर पत्नी संतापली आणि तिने पतीच्या तोंडावर ठोसा मारला.

वाचा : ‘तुम्ही मंडल बरोबर नव्हता तर कमंडल बरोबर…’, प्रकाश आंबेडकरांनी साधला निशाणा

पतीवर आधीपासूनच महागड्या भेटवस्तू न दिल्याचा होता राग

निखिल खन्ना असे मृताचे नाव असून तो बांधकाम उद्योगाचा व्यावसायिक आहे. 36 वर्षीय निखिलने 6 वर्षांपूर्वी 38 वर्षीय रेणुकासोबत प्रेमविवाह केला होता. रेणुकाला तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईला न नेल्याने आणि वाढदिवस आणि लग्नाच्या वाढदिवसाला तिला महागड्या भेटवस्तू न दिल्याने तिचा राग होता.

हे वाचलं का?

वाचा : Crime : मुलगा होता बेपत्ता, कुटुंब शोधत शेतात पोहोचलं अन् मातीचा ढीग… पोलिसांना फुटला घाम

वानवडी पोलीस अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती

वानवडी पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘प्राथमिक तपासात दोघांमध्ये भांडण झाल्याचे समोर आले आहे. रेणुकाला काही नातेवाईकांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दिल्लीला जायचे होते. निखिलही यासाठी तयार नव्हता. त्यामुळे रेणुका आपल्या पतीवर खूप रागावली होती.’

पोलिसांनी पुढे सांगितले की, ‘मारामारीदरम्यान रेणुकाने निखिलच्या तोंडावर ठोसा मारला. हा ठोसा एवढा जोरदार होता की निखिलचे नाक आणि काही दात तुटले. जास्त रक्तस्त्राव झाल्याने निखिल बेशुद्ध झाला. यामुळे निखिलचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल.’

ADVERTISEMENT

वाचा : Crime : बायको आणि दोन मुलींची हातोडीने ठेचून हत्या, मजूराने स्वत:चचं कुटुंब का संपवलं?

या घटनेनंतर वानवडी पोलिसांनी रेणुकाविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक चौकशी आणि चौकशीसाठी पोलिसांनी रेणुकाला ताब्यात घेतले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT