Pune Gangrape : संतापजनक! बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या 21 वर्षीय तरूणीवर गँगरेप
Pune Gang rape: मित्रासोबत बोपदेव घाट परिसरात फिरायला गेलेल्या पीडित तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची ही घटना गुरुवारी (03 ऑक्टोबर) रात्री घडली.
ADVERTISEMENT

Pune Gang Rape Case : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. आताही एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामुळे महाराष्ट्र हादरलं आहे. 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची ही घटना आहे. मित्रासोबत बोपदेव घाट परिसरात फिरायला गेलेल्या पीडित तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची ही घटना गुरुवारी (03 ऑक्टोबर) रात्री घडली. याप्रकरणी तीन अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. तरुणी मित्रांसोबत फिरायला पुण्याजवळील बोपदेव घाटात गेली होती. तेव्हा घाटात फिरायला गेलेल्या पीडिता आणि तिच्या मित्राजवळ तीन तरुण आले. सुरुवातीला त्यांनी मानवधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले.
हेही वाचा : Maharashtra Breaking News : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राचे फोटो काढले. त्यांना धमकावले आणि पीडितेच्या मित्राला मारहाण केली. त्यानंतर त्याला एका झाडाला त्याच्याच बेल्ट आणि शर्टाने बांधून ठेवले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. नंतर, तरूणीला कारमधे बसवून थोड्याच अंतारावर नेण्यात आलं आणि तिथे तिच्यावर तिघांनी बलात्कार केला, अशी माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून त्यांना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी 10 पथके नेमली आहेत.